नगरमध्ये हातावर होम कोरंनटाईनचा शिक्का असलेला वृद्ध आढळला; पोलिसांनी घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 14:05 IST2020-03-26T14:04:49+5:302020-03-26T14:05:49+5:30
हातावर होमकोरंटाइनचा शिक्का असलेला एक वृद्ध व्यक्ती गुरुवारी दुपारी नगर शहरात फिरताना पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

नगरमध्ये हातावर होम कोरंनटाईनचा शिक्का असलेला वृद्ध आढळला; पोलिसांनी घेतले ताब्यात
अहमदनगर : हातावर होमकोरंटाइनचा शिक्का असलेला एक वृद्ध व्यक्ती गुरुवारी दुपारी नगर शहरात फिरताना पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
सदर व्यक्ती नगरमधील राहणारा असून तो कुठे प्रवास करून आला व कुणाच्या संपर्कात आला याची माहिती प्रशासन घेत आहे. सदर साठ वर्षाचा वृद्ध त्याच्या मुलाच्या मोटरसायकलवरून शहरातील सर्जेपुरा परिसरातून जात होता. यावेळी पेट्रोलिंगला असलेल्या पोलिसांनी त्याला थांबवून विचारणा केली. तेव्हा त्याच्या हातावरती होमकोरटाईन असा शिक्का होता. यावेळी पोलिसांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयाला माहिती सांगितली. रुग्णालयाच्या पथकाने येऊन सदर व्यक्तीस घेऊन गेले. यावेळी पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके त्या ठिकाणी उपस्थित होते. सदर व्यक्तीच्या हातावर होम कोरनटाईन असा शिक्का असतानाही तो शहरात फिरून निष्काळजीपणा करीत असल्याने त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.