जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने हिवरे बाजार येथे २००० वृक्षलागवडीचा शुभारंभ

By साहेबराव नरसाळे | Published: June 5, 2023 01:43 PM2023-06-05T13:43:13+5:302023-06-05T13:43:24+5:30

एकूण २००० वृक्षलागवडीचा शुभारंभ करण्यात आला. 

On the occasion of World Environment Day 2000 tree plantation was launched at Hivre Bazar | जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने हिवरे बाजार येथे २००० वृक्षलागवडीचा शुभारंभ

जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने हिवरे बाजार येथे २००० वृक्षलागवडीचा शुभारंभ

अहमदनगर : आदर्श गाव हिवरे बाजार येथे आज, ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वनक्षेत्रात १४०० तसेच गावठाण परिसरात आणि विविध संस्थाच्या परिसरात ६०० असे एकूण २००० वृक्षलागवडीचा शुभारंभ करण्यात आला. पद्मश्री पोपटराव पवार व उपवनसंरक्षक सुवर्णा माने तसेच हिवरे बाजार येथील ज्येष्ठ नागरिक नानाभाऊ पवार यांच्या हस्ते याचा शुभारंभ झाला.

या वृक्षलागवडीसाठी हिवरे बाजार येथील ज्या नागरिकांचे वय ८० वर्षापेक्षा जास्त आहे, त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश राठोड, सरपंच विमल दीपक ठाणगे, सेवा सोसायटीचे उपाध्यक्ष रामभाऊ चत्तर, दामोधर कारभारी ठाणगे आदी उपस्थित होते.

Web Title: On the occasion of World Environment Day 2000 tree plantation was launched at Hivre Bazar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.