देवळालीचे सुपुत्रजगदीश पाटील कदम यांच्याकडून दीड कोटींची मदत देवळाली प्रवरा साठीही पाच लाख!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 01:38 PM2020-04-14T13:38:41+5:302020-04-14T13:38:52+5:30
कोरोना आजराच्या विषाणू संसर्गाने निर्माण झालेल्या राष्ट्रीय आपत्तीचा सामना करण्यासाठी देवळाली प्रवरा शहराचे सुपुत्र व पुणे येथील राजपथ इन्फस्ट्रक्चरचे चेअरमन जगदीश लक्षमनराव कदम पाटील यांनी पीएम केअर फंड साठी एक कोटी तर महाराष्ट्र
राहुरी/देवळाली प्रवरा : कोरोना आजराच्या विषाणू संसर्गाने निर्माण झालेल्या राष्ट्रीय आपत्तीचा सामना करण्यासाठी देवळाली प्रवरा शहराचे सुपुत्र व पुणे येथील राजपथ इन्फस्ट्रक्चरचे चेअरमन जगदीश लक्षमनराव कदम पाटील यांनी पीएम केअर फंड साठी एक कोटी तर महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी पन्नास लाख रुपये दिले आहेत.या मदतीच्या रकमेचे धनादेश पुणे येथे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे कडे सुपूर्द केले .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्यपीएम केअर फंडह्णच्या माध्यमातून देशवासियांना मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरातून मदतीसाठी अनेक हात पुढे आले आहेत.जगदीश कदम यांनी या रकमे बरोबरच आपले जन्म गाव असणाऱ्या देवळाली प्रवरा शहरात सुरू असलेल्या अन्न सुरक्षा समिती साठी राजश्री प्रतिष्ठान च्या वतीने पाच लाख रुपये दिले आहेत.
कदम यांचे कंपनीमध्ये काम करणार्या राज्यातील आणि राज्याबाहेरील १३००कर्मचार्यांनीही आपला तीन दिवसांचा पगार एकत्रित करुन सुमारे १६ लाख १२हजार ४००रुपये मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी दिला आहे.
कोरोनाच्या आपत्तीमुळे झालेल्या महाभयंकर नुकसानीतून पुन्हा एकदा सामर्थ्यशाली राष्ट्रनिर्मिती व्हावी यासाठी उचललेला हा खारीचा वाटा आहे, असे जगदीश पाटील-कदम यांनी सांगितले.
गतवर्षी सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना महापुराचा प्रचंड तडाखा बसला होता. विशेषतः शिरोळ तालुक्याला या महापुराची झळ सर्वाधिक बसली होती. त्याही वेळी जगदीश पाटील यांनी १३०० गॅस शेगड्यांचे वाटप करुन मदतीचा हात दिला होता. मागील काळात जलयुक्त शिवार या राज्य सरकारच्या दुष्काळमुक्ती साठीच्या योजनेतून देवळाली प्रवरा शहरात जलसंधारण ची कामे करण्यासाठी एक पोकलँड मशीन भेट दिलेला आहे.उद्योजक जगदीश कदम हे राहुरीचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे कनिष्ठ बंधू आहेत.
-चौकट-
उद्योजक जगदीश पाटील कदम हे देवळाली शहराचे सुपुत्र आहेत.ते पुण्यात असले तरी त्यांची देवळाली शहराशी असणारी नाळ आजही कायम आहे. शहरवाशीयांवर असणारे त्यांचे प्रेम,जिव्हाळा व काळजी त्यांनी शहरात केलेल्या विविध कार्यातून स्पष्ट झाली आहे.त्यांनी आज शहरातील अन्न सुरक्षा समिती साठी पाच लाख रूपये दिली आहेत.या पूर्वी त्यांनी सोसायटी चौक सुशोभीकरण कामासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च केले आहेत,शहरातील आपल्या वर्गमित्रांना स्वखर्चाने काही दिवसापूर्वी विविध देशाची सफर त्यांनी घडवून आणली,शहरातील जलसंधारण कामासाठी त्यांनी पोकलेन मशीन भेट दिला आहे.देवळाली प्रवरा च्या शहरवाशीयांच्या वतीने राजपथ इन्फस्ट्रक्चर व राजश्री प्रतिष्ठानला धन्यवाद देतो
-उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे