मंदिरातील घंटेला गळफास घेऊन एकाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 22:22 IST2019-07-30T22:22:06+5:302019-07-30T22:22:54+5:30
नगर-पुणे रोडवरील नारायण गव्हाण शिवारात शंकराचे मंदिर आहे.

मंदिरातील घंटेला गळफास घेऊन एकाची आत्महत्या
सुपा (जि. अहमदनगर) : पारनेर तालुक्यातील हंगे येथील तरुणाने नारायणगव्हाण येथील मंदिरातील घंटेला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
नगर-पुणे रोडवरील नारायण गव्हाण शिवारात शंकराचे मंदिर आहे. सोमवारी (दि.२९) सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास मोहन सदाशिव दळवी (वय-३८, रा. हंगा ता.पारनेर) याने आत्महत्या केली. नारायणगव्हाण गावचे शिवारात डोंगरावरील शंकराच्या मंदिरातील देवाच्या घंटीच्या हुकाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. याबाबत किसन दगडू बनकर (वय ३७, रा.हंगे ता. पारनेर) यांनी सुपा पोलीस स्टेशनमध्ये खबर दिल्याने अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार पठाण करत आहेत.