जिल्हा बँकेकडून कोरोना उपाययोजनांसाठी एक कोटी मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:22 AM2021-05-06T04:22:45+5:302021-05-06T04:22:45+5:30
अहमदनगर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने कोरोनाबाबत सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी एक कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. आर्थिक ...
अहमदनगर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने कोरोनाबाबत सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी एक कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. आर्थिक मदतीचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात आला आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष ॲड. उदय शेळके व उपाध्यक्ष माधवराव कानवडे यांनी अर्थिक मदतीचा धनादेश मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे बुधवारी सुपुर्द केला. यावेळी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, विश्वजित कदम, बँकेचे संचालक शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार चंद्रशेखर घुले, आमदार आशुतोष काळे, माजी आमदार राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, गणपतराव सांगळे, प्रशांत गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे आदी उपस्थित होते.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणावर आली असून, सर्वांनी एकत्रित येऊन या महामारीपासून बचाव करण्यासाठी राज्य शासनाला अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने रुपये एक कोटीची मदत करण्याचा निर्णय बँकेच्या संचालक
मंडळाने घेतला. यापूर्वीही बँकेने रुपये २५ लाखाची मदत गेल्यावर्षी मुख्यमंत्री सहायता निधीस केली होती. बँक अडचणीच्या काळात सर्व स्तरावर मदत करण्याचे कार्य करत असून, बँक वेळोवेळी राष्ट्रीय आपत्तीच्या काळात आर्थिक मदत करत असते. कोरोनाच्या संकट काळातही बँकेने मदत करण्याचा निर्णय घेतला असून, एक कोटींची मदत करण्यात आली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांनी दिली.
...
सूचना फोटो आहे