जलजीवन मिशनअंतर्गत एक कोटीचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:20 AM2021-05-07T04:20:59+5:302021-05-07T04:20:59+5:30
संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा आहे. तालुक्यातील १७१ गावे व २४३ वाड्या-वस्त्यांवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासकामे ...
संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा आहे. तालुक्यातील १७१ गावे व २४३ वाड्या-वस्त्यांवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासकामे झाली व सुरू आहेत. विकासाच्या योजना ग्रामीण भागात प्रभावीपणे राबविण्यात आल्या आहेत. वडगाव पान हे मध्यवर्ती गाव आहे. या गावातील प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाणी मिळावे, याकरिता महसूलमंत्री थोरात, यशोधन जनसंपर्क कार्यालयाचे प्रमुख इंद्रजित थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती सदस्या बेबी थोरात यांनी जलजीवन मिशन योजनेंतर्गत एक कोटी रुपयांच्या निधी मंजूर करून घेतला आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ५५ लीटर याप्रमाणे पाणी मिळणार आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून नवीन टाकी घेणे, विद्युत पंपाची दुरुस्ती, नळजोडणी आदी कामे करण्यात येणार आहे.