पाडळी येथे पाटात पोहताना बुडून एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 12:24 PM2020-05-17T12:24:41+5:302020-05-17T12:25:18+5:30
चितळी (ता.पाथर्डी ) येथील राजेंद्र बाबुराव साळवे (वय ३८) यांचा मुळा पाटचारीचे पाण्यात पोहताना बुडून दुदैवी मृत्यू झाला. पाडळी गावच्या शिवारात शनिवारी दुपारी साळवे मित्रांसमवेत पोहत होते.
तिसगाव : चितळी (ता.पाथर्डी ) येथील राजेंद्र बाबुराव साळवे (वय ३८) यांचा मुळा पाटचारीचे पाण्यात पोहताना बुडून दुदैवी मृत्यू झाला. पाडळी गावच्या शिवारात शनिवारी दुपारी साळवे मित्रांसमवेत पोहत होते.
पाण्याचा अंदाज न आल्यान साळवे हे बुडाले. काही ग्रामस्थांना समवेत घेत पोलिसांनी मृतदेह शोधण्यासाठी रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम राबविली. हनुमान टाकळी म्हसोबा लवण भागातील मुळा पाटचारीच्या उपवीतरीकांकडे पाटचारी आवर्तनाचे पाणी पाटबंधारे कर्मचा-यांनी वळविले. पाण्याचा प्रवाह ओसरल्यानंतर येडोबा मंदिराजवळ साळवे यांचा मृतदेह रविवारी सकाळी सूर्योदयाला नजरेस आला. पाथर्डी येथे शवविच्छेदन करून साळवे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत पोलिसात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पोलीस हेड कॉस्टेबल तुकाराम तांबे, अमोल कर्डिले अधिक तपास करीत आहेत. दरम्यान साकेगाव, सुसरे या पाटचारीचे अंतिम भागात आवर्तन पाणी पोहोचण्यास या घटनेमुळे विष्कळीतपणा आला. मृतदेह सापडल्यानंतर आवर्तन पाणी आवर्तन पूर्ववत सुरु करण्यात आले.