काळे कायदे रद्द करण्यासाठी एकीची मूठ घट्ट करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:18 AM2021-02-08T04:18:29+5:302021-02-08T04:18:29+5:30
मेळाव्याच्या अगोदर शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. मागील सत्तर दिवसांपासून दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू असून, या आंदोलनास मेळाव्यातून ...
मेळाव्याच्या अगोदर शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती.
मागील सत्तर दिवसांपासून दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू असून, या आंदोलनास मेळाव्यातून एकमुखी पाठिंबा देण्यात आला. शेतकरीविरोधी तीन नवे काळे तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, ज्ञानदेव वाफारे, राजेंद्र नागवडे, शेतकरी नेते मधुकर नवले, गणपत सांगळे, बी.जे. देशमुख, भानुदास तिकांडे, दादापाटील वाकचौरे, सोन्याबापू वाकचौरे, मीनानाथ पांडे, विजय वाकचौरे, उत्कर्षा रूपवते, विक्रम नवले, बाळासाहेब नाईकवाडी, शोभा निरगुडे, रमेश जगताप आदी उपस्थित होते.
तांबे म्हणाले, केंद्र सरकारकडून होणार शेतकऱ्यांचा अपमान आता सहन केला जाणार नाही. भाजपाच्या काळात बेरोजगारी वाढली. भ्रष्टाचार वाढला. लोकशाही धोक्यात आली. शेतकऱ्याला वेठबिगार शेतमजूर बनविण्याचा घाट नव्या कायदे करून घातला जात आहे. लोकशाही टिकण्यासाठी काँग्रेस बळकटीकरण महत्त्वाचे आहे.
मधुकर नवले म्हणाले, चुकीचे पाऊल पडले होते. वेळीच सावध झालो. पुरोगामी विचारांची कास कधी सोडला नाही. संघर्षातून एकजुटीमुळे तालुक्याचा विकास झाला आहे. मतभेत बाजूला ठेवून तालुकाच्या विकासासाठी आघाडीचा शेतकरी धर्म पळून सहकारातील सर्व निवडणुका लढवू. राष्ट्रवादीला व आमदार डॉ. किरण लहामटे यांना साथ देऊ. बी.जे. देशमुख, भानुदास तिकांडे, मीनानाथ पांडे, उत्कर्षा रूपवते यांचीही भाषणे झाली. अरीफ तांबोळी व शिवाजी नेहे यांनी सूत्रसंचालन केले. विक्रम नवले यांनी आभार मानले.
( ०७ सुधीर तांबे )