राहाता येथे विज वितरण कंपनीच्या निषेधार्थ एक तास रास्ता रोको आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 04:24 PM2017-10-28T16:24:44+5:302017-10-28T16:25:33+5:30

दिवसातून दोन तास विज पुरवठा देण्याचे जाहीर आश्वासन मिळाल्यानंतर शेतकरी एकजुटीचा विजय असल्याच्या घोषणा देत, एक तास  रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.

One hour road blockade by protesting against distributing electricity distribution company at Rahata | राहाता येथे विज वितरण कंपनीच्या निषेधार्थ एक तास रास्ता रोको आंदोलन 

राहाता येथे विज वितरण कंपनीच्या निषेधार्थ एक तास रास्ता रोको आंदोलन 

 

लोकमत न्यूज नेटवर्क
राहाता : दिवसातून दोन तास विज पुरवठा देण्याचे जाहीर आश्वासन मिळाल्यानंतर शेतकरी एकजुटीचा विजय असल्याच्या घोषणा देत, एक तास  रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. आंदोलनामुळे नगर-मनमाड महामार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती.


पूर्व सूचना न देता विज वितरण कंपनीने राहाता तालुक्यातील ग्रामीण भागातील ८० रोहीत्रे बंद केली. यामुळे सुमारे ८०० शेती पंपाचा विज पुरवठा खंडीत झाला. विज वितरण कंपनीने अचानक केलेल्या या कारवाईमुळे ग्रामीण जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे आज राहाता येथील शिवाजी चौकात नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करुन शासन व विज वितरण कंपनी विरुध्दचा आक्रोश व्यक्त केला.

Web Title: One hour road blockade by protesting against distributing electricity distribution company at Rahata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.