नाहुली येथे वादळी पावसात वीज पडून एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 05:06 PM2020-05-10T17:06:00+5:302020-05-10T17:06:33+5:30
जामखेड शहर व तालुुक्यात रविवारी (दि.१० मे) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वादळी वा-यासह विजेच्या कडकडाटासह जोरदार गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले आहेत. फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. तर नाहुली येथे वादळी पावसात वीज पडून शेतकरी राजेंद जाधव (वय ६४) हे जखमी झाले.
जामखेड : शहर व तालुुक्यात रविवारी (दि.१० मे) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वादळी वा-यासह विजेच्या कडकडाटासह जोरदार गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले आहेत. फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. तर नाहुली येथे वादळी पावसात वीज पडून शेतकरी राजेंद जाधव (वय ६४) हे जखमी झाले.
जामखेड शहर व तालुक्यातील शिऊर, सावरगाव, कुसडगाव, झिक्री, नान्नज, दैवदैठण, हळगाव, नायगाव, धोंडपारगाव, पाडळी, नाहुली, पाटोदा परिसरात वादळी वाºयासह गारांसह पाऊस पडला. या पावसामुळे फळबागाांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे पडली आहेत. विजेच्या तारा पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. तर नाहुली येथील शेतकरी राजेंद्र दशरथ जाधव यांच्या अंगावर वीज पडली. यात ते जखमी झाले आहेत. त्यांना जामखेड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.