नेवासा तालुक्यात कोरोनाने एकाचा मृत्यू; मृतांची एकूण संख्या आठवर....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 06:51 PM2020-08-07T18:51:58+5:302020-08-07T18:52:46+5:30
नेवासा तालुक्यात शुक्रवारी (७ आॅगस्ट) खेडले काजळी येथील एका कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. याबाबतचा अहवाल नगरच्या जिल्हा रुग्णालयातून प्राप्त झाला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी यांनी दिली.
नेवासा : नेवासा तालुक्यात शुक्रवारी (७ आॅगस्ट) खेडले काजळी येथील एका कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. याबाबतचा अहवाल नगरच्या जिल्हा रुग्णालयातून प्राप्त झाला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी यांनी दिली.
नेवासा तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मागील पाच दिवसात तालुक्यात तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये एका पोलीस कर्मचा-यासह माळी चिंचोरा व खेडलेकाजळी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. दरम्यान तालुक्यातील मृतांची संख्या ८ वर गेली आहे.
शुक्रवारी नेवासा येथील कोविड केअर सेंटरमध्ये शुक्रवारी ८० व्यक्तींच्या रॅपिड अँटिजेन टेस्टच्या अहवालात तालुक्यातील सहा गावांमधील १८ व्यक्ती कोरोनाबाधीत आढळून आले. यामध्ये नेवासा शहरातील बारा, सलाबतपूर येथील दोन, निंभारी, उस्थळ दुमाला, सोनई, खेडलेकाजळी येथे प्रत्येकी एक व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ६२ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले तर जिल्हा रुग्णालयातून एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दिवसभरात तालुक्यात १९ कोरोना बाधितांची वाढ झाली आहे. तालुक्यात रुग्ण संख्या ३२४ इतकी झाली आहे. शुक्रवारी १९ जणांना डिस्चार्ज दिल्याने २२७ व्यक्ती कोरोनामुक्त मुक्त झाले आहे. तर ८९ व्यक्ती उपचार घेत आहेत.