आपलं गाव फाऊंडेशनकडून भाळवणी कोविड सेंटरला एक लाखाची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:34 AM2021-05-05T04:34:28+5:302021-05-05T04:34:28+5:30
कोरोनासारख्या संकट काळात आमदार लंके यांनी गोरगरिबांच्या सेवेसाठी भाळवणी येथे आरोग्य मंदिर उभे केले आहे. तेथे आमदार लंके हे ...
कोरोनासारख्या संकट काळात आमदार लंके यांनी गोरगरिबांच्या सेवेसाठी भाळवणी येथे आरोग्य मंदिर उभे केले आहे. तेथे आमदार लंके हे स्वत: रुग्णांची विचारपूस करतात, हे पाहून आपलं गाव फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी या कोरोना सेंटरसाठी एक लाखाचा धनादेश आ. लंके यांच्याकडे सुपूर्द केला. गावात आपण अशी सुविधा देऊ शकत नाही. किमान आमदारांनी सुरू असलेल्या या सामाजिक उपक्रमास हातभार लावण्याच्या उद्देशाने आपलं गाव फाऊंडेशनच्या वतीने कोविड केंद्रासाठी लाखाची मदत उभी करुन दिली. आपलं गाव फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुरेश खणकर, सरपंच देवेंद्र जगदाळे, उपसरपंच बाळासाहेब नवले, संतोष जगदाळे, भिकाजी जगदाळे, साहेबराव चौधरी, संजय शिर्के, संतोष बोरुडे, प्रशांत जगदाळे, देवा चौगुले आदी यावेळी उपस्थित होते.