एकासना साधनेने ठेवले व्याधींना दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:19 AM2021-05-24T04:19:56+5:302021-05-24T04:19:56+5:30
तब्बल ३१ वर्षांपासुन शिर्डीतील इचरजबाई लोढा एकासना व्रताच्या साधक प्रमोद आहेर शिर्डी : साईनगरीतील इचरजबाई मोतीलाल लोढा या ८७ ...
तब्बल ३१ वर्षांपासुन शिर्डीतील इचरजबाई लोढा एकासना व्रताच्या साधक
प्रमोद आहेर
शिर्डी : साईनगरीतील इचरजबाई मोतीलाल लोढा या ८७ वर्षांच्या महिलेने तब्बल ३१ वर्षे एकवेळ जेवण (एकासना) करून कोरोनाच नाही, तर वृद्धापकाळातील सर्वच व्याधींना दूर ठेवले आहे. इचरजबाई या येथील स्व.मोतीलाल पूनमचंद लोढा यांच्या पत्नी व उद्योगपती पुखराज लोढा यांच्या मातोश्री आहेत.
इचरजबाईंनी १९९० साली आदीनाथ भगवान यांना प्रार्थना करून एकासना व्रताचा अंगीकार केला. तेव्हापासून त्या दिवसातून फक्त एकदा व एका ठिकाणी बसूनच दुपारी १२.३० वाजता जेवण करतात. यात दूध, जेवन, फळे यापैकी काहीही खायचे असेल तर ते फक्त दुपारी साडेबारा वाजताच खाण्याचा त्यांनी संकल्प केला. जेवणाशिवाय त्या पाणी पितात मात्र तेही सूर्यास्तापूर्वीच. विशेष म्हणजे इचरजबाईनी आयुष्यात कधीही कांदा, लसून व बटाटा या कंदमुळाचे सेवन केलेले नाही.
आपण सध्या डायटबाबत डॉ. दीक्षित यांचे अनुकरण करतो. मात्र ८७ वर्षांच्या आमच्या आजीने ते ३१ वर्षांपूर्वीच सुरू केल्याच त्यांचे नातू व पुण्यातील व्यावसायिक संदीप पुखराज लोढा यांनी सांगितले.
तब्बल ३१ वर्षांच्या या एकासना साधनेमुळे इचरजबाई यांना वयाच्या ८७व्या वर्षीही रक्तदाब, मधुमेह, सांधेदुखी असा कोणताही त्रास नाही. सध्या त्या पुण्यात नातू संदीप याच्याकडे राहतात. इचरजबाई यांचे पतीही धार्मिकवृत्तीचे होते. शिर्डी जैन श्रावक संघाचे ३० वर्षे अध्यक्ष राहिलेल्या मोतीलालजी यांनी २०१५ मध्ये संथारा व्रत घेऊन आपल्या जीवनाची सांगता केली.
।।।।।।फोटो आहे...