अकोले तालुक्यात एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला; लिंगदेवचे १० अहवाल प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 12:48 PM2020-05-25T12:48:05+5:302020-05-25T12:48:49+5:30
अकोले तालुक्यातील ढोकरी येथील एका ३६ वर्षीय तरुणाला कोरनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. त्यास प्रशासनाने नगरला तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, असे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
अकोले : तालुक्यातील ढोकरी येथील एका ३६ वर्षीय तरुणाला कोरनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. त्यास प्रशासनाने नगरला तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, असे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
सदर तरुण हा नवी मुंबई येथील घणसोली परिसरातून २३ मे रोजी अकोले येथे आला होता. त्यास संशयावरुन तपासणीसाठी नगरला पाठविले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह निघाला आहे. त्याचा ढोकरी गावाशी संपर्क आला नाही. या वृत्तास तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंद्रजित गंभिरे यांनी दुजोरा दिला आहे.
दरम्यान, घाटकोपर येथून लिंगदेव येथे आलेला एका ५६ वर्षीय शिक्षक देखील सरकारी तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. लिंगदेव येथील ११ जणांपैकी १० जणांचे तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झाले नाहीत, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गंभिरे यांनी सांगितले.