श्रीरामपुरात ग्रामपंचायतींसाठी एक हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:14 AM2021-01-01T04:14:56+5:302021-01-01T04:14:56+5:30

एकूण २७९ ग्रामपंचायत सदस्यासाठी १५ जानेवारी रोजी या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. २३ डिसेंबरपासून त्याकरिता ऑनलाईन अर्ज दाखल करावयाचे ...

One thousand applications for Gram Panchayats in Shrirampur | श्रीरामपुरात ग्रामपंचायतींसाठी एक हजार अर्ज

श्रीरामपुरात ग्रामपंचायतींसाठी एक हजार अर्ज

एकूण २७९ ग्रामपंचायत सदस्यासाठी १५ जानेवारी रोजी या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. २३ डिसेंबरपासून त्याकरिता ऑनलाईन अर्ज दाखल करावयाचे होत्या. मात्र ऑनलाईन प्रकियेसाठी अनेक अडचणी येत असल्याच्या तक्रारी इच्छुक उमेदवारांनी केल्या. त्यातच तीन दिवस शासकीय सुट्टी आल्याने अखेरच्या दोन दिवशी ऑफलाईन अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी झाली. बुधवारी सायंकाळी तीन वाजेपर्यंतची अर्ज दाखल करण्याची मुदत साडे पाच वाजेपर्यंत वाढविण्यात आली.

तालुक्यातील बेलापूर, टाकळीभान, वडाळा महादेव, भेर्डापूर, मालुंजा, खोकर, निपाणी वाडगाव, गोंडेगाव, कारेगाव, पढेगाव या प्रमुख मोठ्या ग्रामपंचायतींसह मातुलठाण, वळदगाव, बेलापूर खुर्द, घुमनदेव, एकलहरे, गळनिंब, ब्राम्हणगाव वेताळ, लाडगाव, गोवर्धन, मुठेवाडगाव, मातापूर, खानापूर, महांकाळवाडगाव, नायगाव, मांडवे, कुरणपूर या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. टाकळीभान, कारेगाव, वडाळा महादेव, पढेगाव, खोकर, निपाणी वाडगाव, मालुंजा, भेर्डापूर येथील लढतींकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

----------

बेलापुरात ८३ अर्ज

बेलापुरात बिनविरोध निवडणुकासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले होते. अजूनही त्यांनी उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवसापर्यंत तसे आवाहन केलेले आहे. मात्र निवडणुकीसाठी तब्बल ८३ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे बिनविरोधची शक्यता तर कमी झाली आहेच, मात्र तिरंगी किंवा चौरंगी लढतीची शक्यता बळावली आहे.

-----------

फोटो ओळी : श्रीरामपूर निवडणूक

मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये बुध‌वारी सायंकाळी उशिरापर्यंत इच्छुकांनी ग्रामपंचायतीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केलेली गर्दी.

--------

Web Title: One thousand applications for Gram Panchayats in Shrirampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.