सारोळा सोमवंशीच्या महिलांनी पाठविल्या सैनिकांना एक हजार राख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:25 AM2021-08-24T04:25:14+5:302021-08-24T04:25:14+5:30

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील सारोळा सोमवंशी येथील महिलांनी रक्षाबंधनाच्या निमित्त सैनिकांना एक हजार राख्या पाठविल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी ...

One thousand Rakhis to the soldiers sent by the women of Sarola Somvanshi | सारोळा सोमवंशीच्या महिलांनी पाठविल्या सैनिकांना एक हजार राख्या

सारोळा सोमवंशीच्या महिलांनी पाठविल्या सैनिकांना एक हजार राख्या

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील सारोळा सोमवंशी येथील महिलांनी रक्षाबंधनाच्या निमित्त सैनिकांना एक हजार राख्या पाठविल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी सारोळा सोमवंशी येथे त्रिदल या आजी-माजी सैनिक संघटनेच्या शाखेची स्थापना करण्यात आली. यावेळी सैनिकांना सण उत्सवात घरच्या लोकांबरोबर सामील होता येत नसल्याने त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्याचा निर्णय झाला.

सारोळा सोमवंशी हे गाव विसापूरपासून दहा किलोमीटर अंतरावर श्रीगोंदा तालुक्यातील टोकाचे गाव आहे. त्यामुळे रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांना राख्या उपलब्ध करणे अवघड असल्याने पुणे जिल्ह्यात सामाजिक कार्यात काम करणारे शिवाजीराव आढाव यांनी एक हजार राख्या उपलब्ध करून दिल्या. राख्या मंदिराचे पुजारी दिलीप सोमवंशी यांच्या स्वाधीन करण्यात आल्या. एक हजार राख्या पुणे येथील सैनिक विभागाला पाठविण्यात आल्या.

यावेळी सरपंच उज्ज्वला आढाव, उपसरपंच अंजाबापू आढाव, सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव आढाव, त्रिदल सैनिक संघटनेचे अध्यक्ष आनंदा आढाव, मीना आढाव, विद्या आढाव, आबेदा शेख, राजश्री नवले, वर्षा आढाव, दीप्ती आढाव व ग्रामस्थ उपस्थित होते.

220821\3010img-20210822-wa0056.jpg

सोरोळा सोमवंशी ता.श्रीगोंदा येथे सैनिकांना पाठवण्यासाठी राख्या जमा करताना महीला व ग्रामस्थ.

Web Title: One thousand Rakhis to the soldiers sent by the women of Sarola Somvanshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.