श्रीरामपुरात प्रत्येक गावाला एक ग्रामपालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:16 AM2021-05-28T04:16:16+5:302021-05-28T04:16:16+5:30

प्रशासन, नगरपालिका, ग्रामपंचायती, पोलीस व आरोग्य विभाग आदींच्या विशेष प्रयत्नामुळे व खबदारीमुळे तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. आता ...

One village guardian for each village in Shrirampur | श्रीरामपुरात प्रत्येक गावाला एक ग्रामपालक

श्रीरामपुरात प्रत्येक गावाला एक ग्रामपालक

प्रशासन, नगरपालिका, ग्रामपंचायती, पोलीस व आरोग्य विभाग आदींच्या विशेष प्रयत्नामुळे व खबदारीमुळे तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. आता तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी संयुक्तिक प्रयत्नांची गरज आहे. मागील एक ते दोन महिन्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या व होणारे मृत्यू, बेड, इंजेक्शन, ऑक्सिजन न मिळणे यामुळे यंत्रणा हतबल झाली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रशासन, ग्रामपंचायती, नगरपालिका, कोरोना नियंत्रण समित्या यांनी विशेष प्रयत्न केले. काही गावांनी तर पाच दिवस लॉकडाऊन केले होते. त्यामुळे कोरोना नियंत्रणात येत आहे. मे अखेर ग्रामीण भागात तीन हजार ७११ तर शहरी भागात पाच हजार ३१३ व बाहेरील ७७५ असे ९ हजार ७९९ रुग्ण सापडले. त्यापैकी शहरी भागातील ३ हजार ४२६ व ग्रामीण भागातील ४ हजार ४८५ रुग्ण बरे झाले असल्याचे प्रांताधिकारी पवार यांनी सांगितले.

स्थानिक संस्था, कोरोना नियंत्रण समिती व ग्रामस्थ यांच्या मदतीने स्थानिक पातळीवर विविध उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. चाचणी व उपचार याकडे लक्ष द्यावयाचे आहे. तसा अहवाल प्रशासनाला दररोज सादर करावयाचा आहे, असे प्रांताधिकारी पवार यांनी सांगितले.

---------

Web Title: One village guardian for each village in Shrirampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.