नाट्यगृह पूर्ण करण्यास एक वर्षाचा अल्टिमेटम : महापौरांनी केली ठेकेदाराची कानउघडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 05:09 PM2019-01-18T17:09:46+5:302019-01-18T17:10:38+5:30

महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रोफेसर कॉलनी चौकात उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक व भव्य नाट्यगृहाच्या कामास महापौर बाबासाहेब वाकळे व उपमहापौर मालन ढोणे यांनी आज सकाळी अचानक भेट देऊन कामाची पाहणी केली.

One year's ultimatum to complete the playhouse: The mayor has made the contractor's ears open | नाट्यगृह पूर्ण करण्यास एक वर्षाचा अल्टिमेटम : महापौरांनी केली ठेकेदाराची कानउघडणी

नाट्यगृह पूर्ण करण्यास एक वर्षाचा अल्टिमेटम : महापौरांनी केली ठेकेदाराची कानउघडणी

अहमदनगर : महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रोफेसर कॉलनी चौकात उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक व भव्य नाट्यगृहाच्या कामास महापौर बाबासाहेब वाकळे व उपमहापौर मालन ढोणे यांनी आज सकाळी अचानक भेट देऊन कामाची पाहणी केली. धीम्या गतीने होत असलेल्या कामाबद्दल यावेळी महापौर उपमहापौर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी ठेकेदार रसिक कोठारी यांची चांगलीच कानउघडणी केली. एक वर्षाच्या आत नाट्यगृहाचे काम पूर्ण करण्याचा अल्टीनेटम यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिला. मार्चएन्ड पर्यंत आरसीसी बांधकाम पूर्ण झाले पाहिजे अशी सूचना उपमहापौर मालन ढोणे यांनी दिली.
यावेळी नगरसेवक मनोज दुल्लम, नगरसेविका आशा कराळे, शहर अभियंता विलास सोनटक्के, उपअभियंता मनोज पारखे, श्रीकांत निंबाळकर, भाजपचे सतीश शिंदे, शिवाजी कराळे, पुष्कर कुलकर्णी, उदय कराळे, किशोर कानाडे, ठेकेदार रसिक कोठारी, आर्किटेक नेहा शिंदे आदी उपस्थित होते.
वाकळे म्हणाले, नगर शहराला शहरपण येण्यासाठी मोठ्या विकास कामांची गरज आहे. तेवढेच शहराच्या वैभवात भर घालणा-या या नाट्यगृहाचे काम त्वरित पूर्ण करणेही गरजेचे आहे. शहरातील नागरिकांची सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी नाट्यगृहाचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. गेल्या अनेक वर्षापासून या नाट्यगृहाचे काम संथ गतीने चालू आहे. यापुढे आता काम न थांबवता एक वर्षाच्या आत या नाट्यगृहाचे काम पूर्ण झाले पाहिजे. यासाठी पैशाची कमतरता पडणार नाही. राज्य सरकारकडून वेळोवेळी निधी उपलब्ध करुन देऊ. नवीन बांधकामास अडथळा येत असलेल्या जुन्या स्पर्धा परीक्षा केंद्राची इमारत पाडून तेथे तातडीने काम सुरू करण्याचे आदेश देत आहे. तसेच दर आठ दिवसांनी या कामाची पाहणी करून प्रगतीचा आढावा घेणार आहोत.

Web Title: One year's ultimatum to complete the playhouse: The mayor has made the contractor's ears open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.