कांदा लिलाव गुरुवारपर्यंत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:20 AM2021-04-11T04:20:46+5:302021-04-11T04:20:46+5:30
सध्या कांद्याचे दर प्रचंड खाली आले आहेत. आठशे ते हजार रुपये क्विंटलप्रमाणे कांदा विकला जात आहे. सध्या मोठ्या प्रमाणात ...
सध्या कांद्याचे दर प्रचंड खाली आले आहेत. आठशे ते हजार रुपये क्विंटलप्रमाणे कांदा विकला जात आहे. सध्या मोठ्या प्रमाणात गावरान कांद्याचे उत्पादन होत असून, दर लिलावाला तीस ते पस्तीस हजार क्विंटल कांदा विक्रीसाठी येत आहे. मागील लिलावात (८ एप्रिल) ३१ हजार ५०० क्विंटल कांदा विक्रीसाठी आला होता. त्यात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला साडेसातशे ते एक हजार रुपयांपर्यंत दर मिळाला.
दरम्यान, शनिवारचा (दि. १०) लिलाव लॉकडाऊनमुळे बंद होता. जिल्हा प्रशासनाने शेतीविषयक बाजारपेठ किंवा दुकाने लॉकडाऊनमध्ये खुली ठेवण्याचे सांगितले असले तरी प्रतिसाद नसल्याने व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद ठेवला. वाहतूक बंद असल्याने शेतकऱ्यांकडूनही कांद्याची आवक पाहिजे तेवढी झाली नाही. त्यामुळे शनिवारचा लिलाव होऊ शकला नाही. लॉकडाऊन सोमवारी सकाळपर्यंत आहे. त्यामुळे सोमवारचा लिलावही होणार नाही. थेट गुरुवारी (१५) लिलाव पूर्ववत होतील, अशी माहिती बाजार समिती प्रशासनाकडून मिळाली.