कांद्याची घसरण सुरूच

By Admin | Published: September 16, 2014 11:43 PM2014-09-16T23:43:27+5:302024-04-18T20:05:19+5:30

राहुरी : अनेक संकटांचा सामना करत चांगला भाव मिळेल, या आशेवर शेतकऱ्यांनी चाळीत ठेवलेला कांदा आता सडू लागल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे.

The onion continues to decline | कांद्याची घसरण सुरूच

कांद्याची घसरण सुरूच

राहुरी : अनेक संकटांचा सामना करत चांगला भाव मिळेल, या आशेवर शेतकऱ्यांनी चाळीत ठेवलेला कांदा आता सडू लागल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे. राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवारी ३५००० कांदा गोण्यांची आवक झाली असली, तरी भावात १०० रूपयांची घट नोंदवली गेली. लाल कांद्याची आवकही सुरू झाली आहे.
प्रतवारीनुसार क्ंिवटलमध्ये मिळालेला भाव पुढीलप्रमाणे : पहिल्या प्रतीचा कांदा- १९०० ते २३००, दोन- १०५५ ते १९००, तीन ५०० ते १०५०, गोल्टी १६०० ते १८००,जोड ३५० ते ५५०़
या लिलावात पळशी (ता़ पारनेर) येथून लाल कांद्याची आवक झाली, त्याला १०५० रूपये भाव मिळाला़
आवक कमी असूनसुद्धा भाव पडत असल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे. साठवून ठेवलेला कांदा सडू लागल्याने तो बाजारपेठेत आणल्याशिवाय पर्याय नाही. दरम्यान, लाल कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात येण्यास अजून एक महिन्याचा कालावधी लागेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: The onion continues to decline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.