कांद्याच्या चाळीला अज्ञान व्यक्तीने लावली आग; साडेचार लाखांच्या कांद्याचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 01:26 PM2020-09-30T13:26:03+5:302020-09-30T13:26:12+5:30
शेतातील दगडी कांदा चाळीत साठवून ठेवलेल्या कांदा चाळीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना पारनेर तालुक्यातील चोंभूत येथे बुधवारी (३० सप्टेंबर) पहाटे घटली. यात या शेतकºयाचा साडेचार लाख रुपये किंमतीचा कांदा भस्मसात झाला आहे.
अळकुटी : शेतातील दगडी कांदा चाळीत साठवून ठेवलेल्या कांदा चाळीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना पारनेर तालुक्यातील चोंभूत येथे बुधवारी (३० सप्टेंबर) पहाटे घटली. यात या शेतकºयाचा साडेचार लाख रुपये किंमतीचा कांदा भस्मसात झाला आहे.
एकीकडे कांद्याचे भावाने उच्चांक गाठला आहे. पारनेर तालुक्यातील चोभुंत येथील शेतकरी नारायण केरू बरकडे यांच्या गट नं ६२ मध्ये कांद्याची दगडी चाळीत अंदाजे ४०० ते ४५० गोण्या कांदा साठवणूक करून ठेवला होता. त्यावर पांचट व वैरणीच्या साह्याने झाकलेली होते. ३० सप्टेंबर रोजी पहाटे वेळी स्थानिक चौकशीनुसार अज्ञात इसमाने आग लावली असल्याचे निर्दशनास आले.
या घटनेचा पंचनामा केला असून साडेचार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. रावसाहेबमाळी, प्रणल भालेराव, दैनु बरकडे, शिवाजी माळी, अविनाश भालेराव, योगेश बरकडे यांच्या पंचनाम्यावर सह्या आहेत.
तलाठी संतोष तनपुरे, ग्रामसेवक स्वप्निल आंबेडकर, कृषीसेविका डोके यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला आहे. या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.