कांदा ३२०० रुपयांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:53 AM2021-01-13T04:53:36+5:302021-01-13T04:53:36+5:30

अहमदनगर : आवक वाढल्याने घसरलेले कांद्याचे भाव आता पुन्हा वाढू लागले आहेत. सोमवारी नगर बाजार समितीत झालेल्या लिलावात कांद्याचे ...

Onion at Rs | कांदा ३२०० रुपयांवर

कांदा ३२०० रुपयांवर

अहमदनगर : आवक वाढल्याने घसरलेले कांद्याचे भाव आता पुन्हा वाढू लागले आहेत. सोमवारी नगर बाजार समितीत झालेल्या लिलावात कांद्याचे भाव ३२ रुपयांवर पोहोचले.

मध्यंतरी लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने कांद्याचे चार हजारांपर्यंत गेलेले भाव कोसळून २ हजारांपर्यंत आले होते. भाव पडल्याने शेतकऱ्यांनीही कांदा विक्रीस आणणे थांबवल्याने आवक घसरली. परंतु मागील आठवड्यापासून भाव वाढण्यास सुरुवात झाली. आधी अडीच हजार, तर आता तीन हजारांपर्यंत कांदा पोहोचला आहे. सोमवारी नगर बाजार समितीत १ लाख १ हजार ५३२ हजार कांदा गोण्यांची (५५ हजार ८४३ क्विंटल) आवक झाली. त्यात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला २७०० ते ३२०० रुपये भाव मिळाला.

------------

गुरुवारच्या लिलावातील कांदा भाव

प्रथम प्रतवारी २७०० ते ३२००

द्वितीय प्रतवारी २१०० ते २७००

तृतीय प्रतवारी १००० ते २१००

तृतीय प्रतवारी ५०० ते १०००

Web Title: Onion at Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.