कांदा व्यापा-यास साडेतीन कोटींना फसविले : श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 05:34 PM2018-11-21T17:34:12+5:302018-11-21T17:34:20+5:30

श्रीगोंदा येथील कांदा व्यापारी सतीश श्रीमल पोखर्णा व संजय अमृतलाल पोखर्णा यांना केरळ राज्यातील कोल्लम येथील एस.एस.ट्रेडर्सचे मालक मोहमंद राफी या कांदा व्यापाºयाने ३ कोटी ६७ लाख १५ हजार १६७ रूपयांना फसविले. कांदा व्यापा-याकडून फसवणूक होण्याची या परिसरातील ही दुसरी घटना आहे.

Onion traders cheated about three crore: Police filed complaint in Shrigonda police station | कांदा व्यापा-यास साडेतीन कोटींना फसविले : श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कांदा व्यापा-यास साडेतीन कोटींना फसविले : श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील कांदा व्यापारी सतीश श्रीमल पोखर्णा व संजय अमृतलाल पोखर्णा यांना केरळ राज्यातील कोल्लम येथील एस.एस.ट्रेडर्सचे मालक मोहमंद राफी या कांदा व्यापाºयाने ३ कोटी ६७ लाख १५ हजार १६७ रूपयांना फसविले. कांदा व्यापा-याकडून फसवणूक होण्याची या परिसरातील ही दुसरी घटना आहे.
श्रीगोंदा येथील आडते व्यापारी पोखर्णा यांचे आठ दहा वर्षांपासून राफी यांच्याशी विश्वासाने व्यवहार सुरू होते. गेल्या वर्षात राफी याने पोखर्णा बंधुंकडून ८ कोटी ९४ लाख ९५ हजार ९४ रूपयांचा कांदा उधारीने खरेदी केला. त्यापोटी दोन हप्त्यात ५कोटी २७ लाख ८० हजार ८०० पोखर्णा बंधुंच्या बँक खात्यात जमा केले. राहिलेले ३ कोटी ६७ लाख १५ हजार १६७ रूपये मागण्यासाठी संजय पोखर्णा कोल्लमला गेले. त्यांनी राफी यांच्याकडे राहिलेल्या पैशांची मागणी केली असता मी राजकिय पुढारी आहे, मी तुम्हाला पैसै देणार नाही. पुन्हा पैसे मागण्यासाठी आले, तर ठार मारून टाकीन, अशी धमकी राफी यांनी दिली.
त्यानंतर पोखर्णा यांनी मोहमंद राफी याच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: Onion traders cheated about three crore: Police filed complaint in Shrigonda police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.