कांदे-बटाटे महागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:33 AM2020-12-14T04:33:54+5:302020-12-14T04:33:54+5:30
अहमदनगर : ठोक बाजारात बटाटे २५०० ते ३००० रुपये क्विंटल असून किरकोळ बाजारात मात्र बटाटे ४० ते ४५ रुपये ...
अहमदनगर : ठोक बाजारात बटाटे २५०० ते ३००० रुपये क्विंटल असून किरकोळ बाजारात मात्र बटाटे ४० ते ४५ रुपये किलो मिळत आहेत. तसेच ठोक बाजारात कांदा ४ हजार रुपये क्विंटल झाला असून किरकोळ बाजारात ५० रुपये किलोने मिळत आहेत. पालेभाज्यांची गड्डी प्रत्येकी पाच रुपयांना झाली असून पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्याने इतर सर्व भाजीपाला स्वस्त झाला आहे.
नगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी कांद्याचे भाव ४ ते ४५०० रुपये क्विंटल होते. बटाट्याचे भाव २५०० ते ३००० क्विंटल होते. याशिवाय इतर भाजीपाला स्वस्त होता. पालेभाजीमध्ये कोथिंबीर, मेथी ४०० रुपये प्रति शंभर गड्डी, तर पालक, करडी भाजी ८०० रुपये प्रति शंभर गड्डी असा भाव होता. किरकोळ बाजारात अनुक्रमे पाच रुपये, दहा रुपये पालेभाजीची गड्डी विकली गेली. ठोक बाजारात सर्वच भाजीपाला ७ रुपये ते १५ रुपये किलो असा भाव होता. त्यामुळे ग्राहकांनाही स्वस्त भाज्या मिळत आहेत.
---
बाजार समितीमधील ठोक भाव (दर रुपये प्रति क्विंटल)
टोमॅटो (१५००), वांगी (७५०), फ्लावर (७००), कोबी (८५०), काकडी (७५०), गवार (४५००), घोसाळे (१५००), दोडका (१७५०), कारले (१५००), भेंडी (१७५०), वाल (१२५०), हिरवी मिरची (२५००), लिंबू (११५०), आद्रक (२५००), गाजर (१७५०), दुधी भोपळा (७५०), कांदे (४५००), वटाणा (३५००).
-----------
फळेही स्वस्त
रविवारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळांचे दरही स्वस्त झाले होते. मोसंबी (२५००), संत्रा (१५००), डाळिंब (८५००), पपई (५५०), सीताफळ (३०००), चिक्कू (२५००), सफरचंद (६०००), बोरं (७५०), असे प्रतिक्विंटल दर होते.
--
फाइल फोटो वापरावा