आॅनलाईन दुचाकीचोर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 10:22 AM2018-07-13T10:22:23+5:302018-07-13T10:22:51+5:30
ओएलएक्स या वस्तूंच्या खरेदी-विक्रीच्या आॅनलाईन वेबसाईटवर दुचाकी विक्री करणाऱ्यांशी संपर्क करून त्यांच्या दुचाकी लांबवणाºया चोराला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून आणखी चोºया उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.
अहमदनगर : ओएलएक्स या वस्तूंच्या खरेदी-विक्रीच्या आॅनलाईन वेबसाईटवर दुचाकी विक्री करणाऱ्यांशी संपर्क करून त्यांच्या दुचाकी लांबवणाºया चोराला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून आणखी चोºया उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.
अविनाश सहादू कर्डिले (वय २०, रा. दूधसागर सोसायटी, देवी मंदिरामागे, केडगाव) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी ओएलएक्स या वेबसाईटवर विक्रीसाठी अपलोड केलेल्या दुचाकी मालकांशी संपर्क करून गाडी घेण्याच्या बहाण्याने चोरी करायचा. शहरातील डॉ. संदीप पाटील यांनी १० जुलै रोजी आपली दुचाकी विक्रीसाठी ओएलएक्सवर टाकली होती. आरोपी कर्डिले याने ही दुचाकी घेण्याच्या बहाण्याने डॉ. पाटील यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर दुचाकीची चक्कर मारतो असे सांगून दुचाकी लांबवली.
याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलीस आरोपीच्या शोधात होते. गुरूवारी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने या आरोपीला छापा टाकून एमआयडीसीमधील सह्याद्री चौकात दुचाकीसह पकडले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी एकूण दोन दुचाकीसह अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.