प्राचार्य चंद्रकांत भोसले यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त ऑनलाईन समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:16 AM2021-05-31T04:16:23+5:302021-05-31T04:16:23+5:30
प्राचार्य चंद्रकांत भोसले यांनी शेवगाव, पारनेर, नगर, धुळे, नंदुरबार, राहुरी येथे सेवा केली असून अनेक विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन केले ...
प्राचार्य चंद्रकांत भोसले यांनी शेवगाव, पारनेर, नगर, धुळे, नंदुरबार, राहुरी येथे सेवा केली असून अनेक विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन केले आहे. प्लास्टिक उत्पादनाबाबतीत अनेकांना मार्गदर्शन करून उद्योग उभे करून दिले आहेत. ते ज्येष्ठ साहित्यिक असून त्यांच्या ‘मृत्युदंड’ आणि ‘दोन बाल एकांकिका’ या वाङ्मय ग्रंथास महाराष्ट्र सरकारने उत्कृष्ट वाङ्मय शासकीय पुरस्काराने सन २००६ आणि २००७ साली दोन वेळा सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील अनेक काव्यसंमेलनांमध्ये ते सहभागी झालेले असून शब्दगंध साहित्यिक परिषदेचे ते माजी अध्यक्ष आहेत. फुले, शाहू, आंबेडकरी विचारांच्या संस्था, संघटनाच्या माध्यमातून ते सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. वाचकपीठ या वाचन चळवळीची सुरुवात त्यांनी केलेली असून विविध काव्यसंग्रहावर आतापर्यंत त्यांनी चर्चा घडवून आणल्या आहेत. त्यांच्या साहित्यिक आणि सेवेतील मित्रांनी मिळून सोमवारी ऑनलाईन सेवानिवृत्ती समारंभ आयोजित केलेला आहे. या ऑनलाईन समारंभात सहभागी व्हावे, असे आवाहन शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे व संयोजक प्रा. दादा ननवरे यांनी केले आहे.