अमेरिकेतील चित्रकारांचा आमटे वसतिगृहातील मुलांशी ऑनलाइन संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:21 AM2021-04-11T04:21:12+5:302021-04-11T04:21:12+5:30
श्रीगोंदा : कोरोनाचे संकट पुन्हा उभे राहिल्याने लेखक, वक्ते, कलाकार हे ऑनलाइनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांशी संवाद साधू लागले ...
श्रीगोंदा : कोरोनाचे संकट पुन्हा उभे राहिल्याने लेखक, वक्ते, कलाकार हे ऑनलाइनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांशी संवाद साधू लागले आहेत. अमेरिकेतील चित्रकार डॉ. मृणालिनी राडकर आणि अनुराधा परब यांनी श्रीगोंदा येथील महामानव बाबा आमटे वसतिगृहातील मुलांशी ऑनलाइन संवाद साधला.
डॉ. मृणालिनी राडकर यांनी भारतातील अजिंठा, वेरूळ येथील जगप्रसिद्ध लेणी, राजस्थानमधील लोकनृत्य, किल्ले, मंदिरे स्थापत्य कला, ताजमहाल आदी गोष्टी दाखवून त्यातील जिवंतपणा अजूनही जिवंत आहे, या कलेमुळे मानवी संस्कृतीचे खरे अस्तित्व टिकून आहे, कलेची जोपासना करणे ही काळाची गरज आहे, असेे मत व्यक्त केले.
मिनी लाॅकडाऊनच्या काळात मुलांना चांगल्या विचारांची मेजवानी मिळावी यासाठी बाबा आमटे संस्थेने दीपा देशमुख आणि डॉ. मृणालिनी राडकर यांच्या माध्यमातून संस्थेतील मुलांसाठी विविध विषयांवर संवाद नावाची मालिका सुरू केली आहे.