हनुमान टाकळी सेवा संस्थेची ऑनलाईन सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:21 AM2021-09-27T04:21:56+5:302021-09-27T04:21:56+5:30
तिसगाव : श्री क्षेत्र हनुमान टाकळी (ता. पाथर्डी) येथील सेवा सहकारी संस्थेची ५१ वी वार्षिक सभा अध्यक्ष अशोक ...
तिसगाव : श्री क्षेत्र हनुमान टाकळी (ता. पाथर्डी) येथील सेवा सहकारी संस्थेची ५१ वी वार्षिक सभा अध्यक्ष अशोक काजळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी ऑनलाईन पद्धतीने पार पडली.
सेवा संस्थांना वार्षिक सभा घेण्यासाठी सहकार विभागाने येत्या मार्च अखेर मुदतवाढ दिली. तालुक्यातील एकूण ८४ सेवा संस्थांपैकी ऑनलाईन सभा घेणारी हनुमान टाकळी सेवा संस्था एकमेव ठरली आहे. संस्था चालवित असलेल्या धान्य दुकानास दीड लाख रुपये, खत दुकानास पावणेतीन लाख तर संस्थेसही एकूण १४ लाख रुपयांचा नफा झाला आहे. यावर्षी सभासदांस १५ टक्के उच्चांकी लाभांश वितरित करण्यात येणार आहे, असे खरेदी-विक्री संघाचे संचालक सुभाष बर्डे यांनी सभासदांना संबोधित करताना सांगितले.
ताळेबंद अहवाल वाचन सचिव बाळासाहेब ताठे यांनी केले. शिवाजी मुळे यांनी आभार मानले. वृृद्धेश्वरचे संचालक कुशीनाथ बर्डे, उपाध्यक्ष संजय डमाळ, संचालक बाबासाहेब बर्डे, संभाजी दगडखैर, दूध संस्थेचे अध्यक्ष संजय बर्डे, बलभीम दळवी आदी सहभाग झाली होते.