तिळवण तेली समाजाचा ऑनलाईन मेळावा
By | Published: December 8, 2020 04:17 AM2020-12-08T04:17:37+5:302020-12-08T04:17:37+5:30
अहमदनगर : तिळवण तेली समाजाच्या वतीने राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय मेळावा ऑनलाईन पद्धतीने उत्साहात झाला. कार्यक्रमाला ...
अहमदनगर : तिळवण तेली समाजाच्या वतीने राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय मेळावा ऑनलाईन पद्धतीने उत्साहात झाला. कार्यक्रमाला सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत पालकांनी हजेरी लावली. या मेळाव्यात ११०० वधू-वरांची नोंदणी असलेल्या परिचयपुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले. ही पुस्तिका समाजातील सर्वांनी मोफत वितरीत करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा अंतर्गत अहमदगर जिल्हा तेली महासभा आणि संताजी विचारमंच अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सावेडी येथील माऊली संकुल सभागृहात हा कार्यक्रम झाला. प्रास्ताविक वधू-वर परिचय मेळावा समितीचे अध्यक्ष सोमनाथ देवकर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक सतीश गवळी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, उद्योजक जगन्नाथ गाडेकर, व्यापारी राहुल म्हस्के, उद्योजक विनोद राऊत, राहुरी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आसाराम भाऊ शेजूळ, उद्योजक बबलू पतके , पुणे येथील उद्योजक संतोष माकोडे, व्यापारी दिलीप दारुणकर, कैलास शेलार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संत संताजी महाराज यांच्या मुर्तीपूजनाने व दीपप्रज्वलनाने झाली.
यानिमित्ताने समाजातील राज्यातील विविध भागांतील उपवर-वधूची माहिती, फोटो व त्यांचा पत्ता व संपर्क क्रमांक असलेले रेशीमगाठी पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून समाजबांधव उपवर -वधू, पालक या मेळाव्यास उपस्थित होते. या सर्वांना पुस्तिका मोफत देण्यात आली. मान्यवरांनी आपल्या भाषणात संताजी विचारमंचच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
--------
समाजात एकजूट राहण्यासाठी व वधू-वरांची योग्य प्रकारे निवड करण्यासाठी मेळाव्यांचे सातत्याने आयोजन होणे आवश्यक आहे. मेळाव्याचे हे चौथे वर्ष असून सर्व सेवा मोफत दिली जाते. ज्या वधू-वरांची नावे पुस्तिकेत आहेत, त्यांना ही पुस्तिका मोफत घरपोच पाठविण्यात येणार आहे. नगरमधील ज्या तेली समाजबांधवांना सदर पुस्तिका हवी आहे, त्यांनाही देण्यात यूणार आहे. ऑनलाईन पद्धतीनेही या मेळाव्याचा अनेकांनी लाभ घेतला.
-सोमनाथ देवकर,अध्यक्ष. तिळवण तेली समाज
---------
फोटो- ०७ तिळवण तेली समाज
तिळवण तेली समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्याप्रसंगी वधू-वरांची यादी असलेल्या पुस्तिकेचे रविवारी सावेडी येथे प्रकाशन करण्यात आले. यावेळी समाज संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.