जयहिंदच्यावतीने महिला दिनानिमित्त ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:38 AM2021-03-04T04:38:05+5:302021-03-04T04:38:05+5:30
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जयहिंद महिला मंचच्या वतीने तालुक्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आरोग्य शिबिरे, ...
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जयहिंद महिला मंचच्या वतीने तालुक्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आरोग्य शिबिरे, बचत गट, वक्तृत्व स्पर्धा, सहल, कृषी पर्यटन, गृह उद्योग, संगणक साक्षरता, वाचन ग्रुप असे उपक्रम सातत्याने राबविले जात आहे. स्वच्छता अभियानात महिलांना सक्रिय ठेवून घर व घराचा परिसर सुंदर बनविणे. ओला व सुका कचरा वर्गीकरण,बाग बगीचा निर्मिती असे उपक्रम राबविले जात आहे. महिलांसाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयात स्वतंत्र महिला कक्ष ही सुरु करण्यात आला आहे.
८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामध्ये महिलांचे कुटुंबातील आर्थिक नियोजन, महिलांचे कौटुबिक योगदान, महिला सबलीकरण या विषयावर स्पर्धक महिलांनी पाच मिनिटे बोलायचे आहे. या ऑनलाईन स्पर्धेत जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जयहिंद महिला मंचच्या वतीने केले आहे.