असंघटित कामगारांची ऑनलाइन नोंदणी
By | Published: December 5, 2020 04:40 AM2020-12-05T04:40:19+5:302020-12-05T04:40:19+5:30
शेवगाव : जनशक्ती श्रमिक संघाच्या वतीने तालुक्यातील अमरापूर व परिसरातील कष्टकरी, असंघटित बांधकाम कामगारांची ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली ...
शेवगाव : जनशक्ती श्रमिक संघाच्या वतीने तालुक्यातील
अमरापूर व परिसरातील कष्टकरी, असंघटित बांधकाम कामगारांची ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली असून, जास्तीत जास्त कामगारांनी ऑनलाइन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जनशक्ती श्रमिक संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. शिवाजीराव काकडे यांनी केले आहे.
असंघटित बांधकाम कामगारांच्या ऑनलाइन नोंदणीचा प्रारंभ शुक्रवारी करण्यात आला. यावेळी सुरेश नानासाहेब चौधरी, दीपक सरोदे, गणेश म्हस्के, नामदेव सुरवसे, जालिंदर वाघ, सुधाकर पोटफोडे, फारुख शेख, महादेव क्षीरसागर, गणेश गायकवाड, शिवाजी तांबे, संतोष कळमकर, रवींद्र साठे, राजेंद्र मगर, ज्ञानेश्वर आवारे आदी उपस्थित होते.
काकडे म्हणाले, अमरापूरसह परिसरातील बांधकाम कामगार रोजंदारीवर कामावर जातात. एक दिवस खाडा झाला तरी त्यांना रोजंदारीला मुकावे लागते. मग, त्यांचे हे पैसे बुडू नये व शेवगावला ये-जा करण्यात त्यांचे पैसे खर्च होऊ नये याकरिता जनशक्ती श्रमिक संघाच्या वतीने त्यांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.