दस्त नोंदणी सोयीसाठी ऑनलाइन सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:21 AM2021-04-10T04:21:24+5:302021-04-10T04:21:24+5:30

दुय्यम निबंधक कार्यालयातील डाटा एन्ट्री किंवा दुरुस्त्या पूर्णपणे थांबविण्यात येत आहे. नागरिकांनी पीडीई डेटा एन्ट्री करून दस्त नोंदणीसाठी या ...

Online service for diarrhea registration facility | दस्त नोंदणी सोयीसाठी ऑनलाइन सेवा

दस्त नोंदणी सोयीसाठी ऑनलाइन सेवा

दुय्यम निबंधक कार्यालयातील डाटा एन्ट्री किंवा दुरुस्त्या पूर्णपणे थांबविण्यात येत आहे. नागरिकांनी पीडीई डेटा एन्ट्री करून दस्त नोंदणीसाठी या विभागाच्या वेबसाइटवर ईस्टेप-इन याप्रणालीद्वारे दुय्यम निबंधक कार्यालयातील उपलब्ध असलेली सोयीची वेळ ऑनलाइन आगाऊ बुक करून किंवा कार्यालयीन दूरध्वनीवर, समक्ष संपर्क साधून वेळ आरक्षित केली नसल्यास दस्त नोंदणी होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. नागरिकांनी दस्ताचे निष्पादन घरी किंवा कार्यालयाच्या बाहेरच करावे व प्रत्येक व्यक्तीने सह्यांसाठी स्वत: पेन आणणे, एकच पेन एकमेकांत सह्यांसाठी वापरू नये, आरक्षित वेळेलाच कार्यालयात हजर रहावे, मास्क लावल्या शिवाय कोणत्याही व्यक्तीला कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही यांची नोंद घ्यावी.

विभागाच्या वेबसाइटवर लिव्ह ॲण्ड लायसन ई-रजिस्ट्रेशन प्रणालीचा पर्याय उपलब्ध असल्याने लिव्ह ॲण्ड लाइसन दस्ताची कार्यालयातील नोंदणी ( फिजिकल रजिस्ट्रेशन) पुढील आदेशापर्यंत थांबविण्यात येत आहे. सेवा सुविधांचा वापर करण्याचे अनिवार्य केले असून, त्याचा वापर करून दस्त नोंदणीबाबत शासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Web Title: Online service for diarrhea registration facility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.