दोन्ही डोस घेणारे केवळ ६ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:26 AM2021-07-07T04:26:54+5:302021-07-07T04:26:54+5:30
अहमदनगर : राज्यात डेल्टा प्लसने चिंता वाढविली असताना नगर जिल्ह्यात मात्र लसीकरणाला हवी तेवढी गती मिळताना दिसत नाही. आतापर्यंत ...
अहमदनगर : राज्यात डेल्टा प्लसने चिंता वाढविली असताना नगर जिल्ह्यात मात्र लसीकरणाला हवी तेवढी गती मिळताना दिसत नाही. आतापर्यंत केवळ २ लाख २२ हजार म्हणजे ६ टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. त्यामुळे हे लसीकरण कधी पूर्ण होणार, असा प्रश्न आहे. जागतिक आरोग्य संघटनेने डेल्टा प्लसचा धोका गंभीर असल्याचे स्पष्ट केले आहे. येत्या काही दिवसांत त्याचे परिणाम दिसण्याची शक्यता असून तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी लसीकरण हेच हत्यार आहे. जास्तीत जास्त लसीकरण करून यातून वाचता येईल या उद्देशाने शासनाने लसीकरण वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत; परंतु त्याला हवी तेवढी गती येताना दिसत नाही.
नगर जिल्ह्यात १८ वर्षांपुढील सर्वच नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून ती संख्या ३८ लाख ८६ हजार आहे. १६ जानेवारीपासून नगर जिल्ह्यात लसीकरण सुरू झाले आहे. त्यात आतापर्यंत ७ लाख ६५ हजार ६८३ जणांनी पहिला डोस घेतलेला आहे. हे प्रमाण २० टक्के आहे. त्या तुलनेत दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या २ लाख २२ हजार ५९२ म्हणजे केवळ ६ टक्केच आहे. हीच गती राहिली तर लसीकरण केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न आहे. विशेष म्हणजे तरुणांच्या लसीकरणाचे प्रमाण फारच कमी आहे. त्यात वाढ करण्याची गरज व्यक्त होत आहे.
--------------
जिल्ह्यातील लसीकरण
एकूण लसीकरण - ९८८२७५
पहिला डोस - ७६५६८३
दोन्ही डोस - २२२५९२
--------------
१८ ते ४४ वयोगटात केवळ ५ टक्के
जिल्ह्यात १८ ते ४४ या वयोगटात २२ लाख ५३ हजार ६५८ एवढ्या नागरिकांना लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. त्या तुलनेत आतापर्यंत पहिला डोस केवळ १ लाख १८ हजार ७८३ म्हणजे ५ टक्के लोकांना घेतला आहे. या गटात दुसरा डोस अद्याप कोणीच घेतलेला नाही.
-------------
पहिला डोस दुसरा डोस
आरोग्य कर्मचारी ४४७०८ ३३३६०
फ्रंटलाइन वर्कर ५८४६० २२४६७
१८ ते ४४ वयोगट ११८७८३ ८५८४
४५ ते ६० वयोगट २७३८०३ ६०८४९
६० वर्षांपुढील २६९९२९ ९७३३२
------------------
फोटो - ०६ कोरोना लसीकरण रांग