भाजपमध्ये फक्त पहिलाच नंबर; दुसरा नव्हे : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 06:13 PM2019-05-09T18:13:41+5:302019-05-09T18:15:05+5:30
ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी माझे नाव घेतलेले नाही. भाजपमध्ये फक्त मुख्यमंत्रीच नंबर एकचे आहेत. त्यामुळे दुस-या नंबरचा प्रश्नच नाही, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले.
शिर्डी : ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी माझे नाव घेतलेले नाही. भाजपमध्ये फक्त मुख्यमंत्रीच नंबर एकचे आहेत. त्यामुळे दुस-या नंबरचा प्रश्नच नाही, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले.
लोणी येथे गुरुवारी कार्यक्रमासाठी आलेल्या चंद्रकांत पाटील यांनी साईदरबारी हजेरी लावत साईसमाधीचे दर्शन घेतले़ नारायण राणे यांनी आपला भाजप प्रवेश नंबर दोनच्या नेत्यामुळे रखडल्याचे नुकतेच विधान केले होते़ या प्रश्नाला उत्तर देताना पाटील म्हणाले, राणे यांनी माझे नाव घेतलेले नाही. भाजपमध्ये मुख्यमंत्री फडणवीस हेच एक नंबरचे आहेत. त्यामुळे दोन नंबरचा प्रश्नच नाही. राज्यात महायुतीला ४४ जागा मिळतील, असे अंदाज सर्व टिव्ही चॅनल्स वर्तवित आहेत. तरीही निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत सर्वांना चिंता असतेच.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे भाजपाच्या वाटेवर आहेत. त्यांना महसूल किंवा गृहखाते मिळेल, असे अंदाज माध्यमात वर्तविले जात आहेत़, असे पत्रकारांनी विचारले असता पाटील यांनी सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांचे असतात. गेल्या पाच वर्षात ते किती सक्षम आहेत हे सर्वांनी पाहिले आहे, असे सांगितले. याप्रसंगी डॉ़ सुजय विखे, शिवाजी गोंदकर, सुजीत गोंदकर, गजानन शेर्वेकर, नितीन कोते, रवींद्र गोंदकर, तुषार शेळके, सचिन शिंदे, किरण बोºहाडे, सीताराम सावकारे, रमशे बिडये, लखन बेलदार, दत्ता कोते यांची उपस्थिती होती.