पाणी दुष्काळग्रस्तांच्या शेतीत जाईल तोच खरा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:15 AM2021-06-28T04:15:38+5:302021-06-28T04:15:38+5:30

थोरात यांनी तालुक्यातील ० ते २८ किलोमीटर लांबीच्या कालव्याची पाहणी केली. उजवा व डावा कालवा जलद गतीने पूर्ण करून ...

The only real joy is the water going to the farms of the famine-stricken | पाणी दुष्काळग्रस्तांच्या शेतीत जाईल तोच खरा आनंद

पाणी दुष्काळग्रस्तांच्या शेतीत जाईल तोच खरा आनंद

थोरात यांनी तालुक्यातील ० ते २८ किलोमीटर लांबीच्या कालव्याची पाहणी केली.

उजवा व डावा कालवा जलद गतीने पूर्ण करून २०२२ पर्यंत सर्वांना पाणी मिळेल यासाठी काम करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी अशोक भांगरे, मीनानाथ पांडे, अमित भांगरे, रामहरी कातोरे, अजय फटांगरे, विक्रम नवले, प्रदीप हासे, भानुदास तिकांडे, दादा पाटील वाकचौरे, उत्तम घोरपडे, नानासाहेब शेळके, मंदाबाई नवले, भास्क आरोटे, उत्कर्षा रुपवते, परबत नाईकवाडी, सुकलाल गांगवे, रंगनाथ निर्मळ, प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसीलदार मुकेश कांबळे, कालवे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद माने, धरण विभागाच्या कार्यकारी अभियंता संगीता जगताप, विवेक लव्हाट, तहसीलदार अमोल निकम यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी धरणालगत असलेल्या आयसीपीयू या महत्त्वपूर्ण बोगद्याचे ब्लास्टिंग करून कालव्यांसाठी खुले करण्यात आले. हा दुष्काळी भागासाठी अत्यंत महत्त्वाचा क्षण ठरला. मंञी थोरात यांनी म्हाळादेवी येथील जलसेतू, मेहेंदुरी, बहिरवाडी, उंचखडक खुर्द, ढोकरी, खानापूर, रेडे, सुगाव खुर्द, कुंभेफळ, कळस खुर्द तांभोळ येथील सुरू असलेल्या कालवे कामांची पाहणी केली.

थोरात म्हणाले, या धरणाच्या कामासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. अडचणींवर मात केल्यानंतर धरणाची भिंत उभी राहिली. दुष्काळी भागाला पाणी देण्याकरता बोगद्यांची कामेही पूर्ण केली. २०२२ च्या पावसाळ्यापर्यंत उजव्या व डाव्या या दोन्ही कालव्यांची कामे पूर्ण करण्यासाठी धरणाच्या इतिहासात सर्वांत जास्त ४९५ कोटी रुपयांचा निधी मागील वर्षी दिला. कामांसाठी निधी कमी पडणार नाही. हे पाणी दुष्काळग्रस्तांच्या शेतीत जाईल तोच खऱ्या अर्थाने आपल्या जीवनातील आनंदाचा दिवस ठरणार आहे.

Web Title: The only real joy is the water going to the farms of the famine-stricken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.