‘जलयुक्त’च्या कामांची समितीकडून खुली चौकशी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 12:43 PM2021-03-03T12:43:43+5:302021-03-03T12:45:00+5:30
नगर जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून केलेल्या कामांची विशेष तपास समितीकडून बुधवारी (दि.३ मार्च) बैठकीत सकाळी साडेअकरा वाजता खुली चौकशी सुरु झाली आहे.
अहमदनगर : नगर जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून केलेल्या कामांची विशेष तपास समितीकडून बुधवारी (दि.३ मार्च) बैठकीत सकाळी साडेअकरा वाजता खुली चौकशी सुरु झाली आहे.
गेल्या पाच वर्षातील जलयुक्त शिवारच्या कामातील तक्रारी नगर जिल्ह्यात चव्हाट्यावर आल्या होत्या. जलयुक्तच्या बाबत ७४ पैकी ५० तक्रारी निकाली काढण्याचा दावा केला होता. तरी २४ तक्रारी पाच वर्षापासून दुर्लक्षीत होत्या. कृषी विभागाव्यक्तीरिक्त वन, जलसंधारण, लघुपाटबंधारे, मृद विभागाच्या १४ तक्रारी आहेत.
दरम्यान, चौकशी समिती येणार म्हणून मागील चार दिवसापासून कृषी अधिकाºयांची अहवाल शोधण्यासाठी धावपळ सुरू होती. या योजनेवर पाच वर्षात ६६३ कोटी खर्च केला आहे. यातून २ लाख ६८ हजार ५६४ टीएमसी पाणी क्षमता वाढली आहे. याचा ५ लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्राला फायदा झाला आहे, असा दावा केला आहे.
दरम्यान, जलसंधारणाच्या या कामाची चौकशी करण्यासाठी बुधवारी सकाळीच दाखल झाली आहे. या समितीने खुली चौकशी सुरू केली आहे.