विरोधकांनी बाबांचे दर्शन घेतल्यास त्यांचे मन साफ होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:16 AM2021-01-09T04:16:58+5:302021-01-09T04:16:58+5:30

अभिनेता सोनू सुद यांने शुक्रवारी ध्यान्ह आरतीला हजेरी लावली. आरतीनंतर संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांनी त्यांचा सत्कार केला. त्यानंतर ...

Opponents will clear their minds if they visit Baba | विरोधकांनी बाबांचे दर्शन घेतल्यास त्यांचे मन साफ होईल

विरोधकांनी बाबांचे दर्शन घेतल्यास त्यांचे मन साफ होईल

अभिनेता सोनू सुद यांने शुक्रवारी ध्यान्ह आरतीला हजेरी लावली. आरतीनंतर संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांनी त्यांचा सत्कार केला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सूद म्हणाले, कोरोनामुळे बाबांच्या दर्शनाला खुप दिवसांनी आलो आहे. जीवनात काहीतरी ध्येय देण्याचे वर्षभरापुर्वी बाबांना साकडे घातले होते. त्यांंनी दाखवलेल्या मार्गावरूनच मार्गक्रमण सुरू आहे. ते कायम आयुष्यभर सुरू राहावे, असाच प्रयत्न आहे. लॉकडाऊनमध्ये ज्यांना मी घरी पाठवले ते माझ्या परिवारातील आहेत. त्यामुळे हे काम करताना अडचण जाणवली नाही. परिवार जोडला गेला. परिवारात आज साडेसात लाख लोक आहेत. रोजगार व आरोग्यासंदर्भात त्यांच्या संपर्कात आहे. परिवार जीतका मोठा होईल, तितकी शक्ती बाबांनी द्यावी.

.............

चाहत्यांनी केली गर्दी

मंदीर परिसराच्या बाहेर पडलेल्या सूद यांना बघण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे काही काळ नगर ते मनमाड महामार्गावरील वाहतूक खोळंबली. चाहत्यांच्या गर्दी मिसळून सर्वांना अभिवादन करत त्याने सर्वांनाच सुखद धक्का दिला. यावेळी अनेकांनी मोबाईल मध्ये त्याची छबी टिपली तर अनेकांनी सेल्फी काढली.

...........

वृध्दाश्रमाला दिली भेट

दर्शनानंतर सोनू सुद येथील द्वारकामाई वृद्धाश्रमाला भेट दिली. यावेळी आश्रमाचे संचालक श्रीनिवास रेड्डी, सचिन तांबे, विनोद राक्षे, आरिफ शेख आदींची उपस्थीती होती. आश्रमाच्या कार्याची व उत्तम व्यवस्थेचे कौतुक करत वृद्धांशी हितगुज केले.

( ०८ सोनू सूद)

Web Title: Opponents will clear their minds if they visit Baba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.