प्रशिक्षणातून ग्रामीण भागातील मुलींना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:21 AM2021-02-11T04:21:48+5:302021-02-11T04:21:48+5:30

कोपरगाव : पोलीस आणि आर्मी विभागात मुलींना चांगली संधी प्राप्त झाली आहे. त्यामुळे हे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ...

Opportunities for girls in rural areas through training | प्रशिक्षणातून ग्रामीण भागातील मुलींना संधी

प्रशिक्षणातून ग्रामीण भागातील मुलींना संधी

कोपरगाव : पोलीस आणि आर्मी विभागात मुलींना चांगली संधी प्राप्त झाली आहे. त्यामुळे हे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या मुलींनी या संधीचा लाभ घेवून स्वत:च्या पायावर उभे राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे यांनी केले.

कोपरगाव येथील प्रिशदर्शनी ग्रामीण महिला मंडळ संचलित बी.एस्सी. (होमसायन्स) आणि बी.सी.ए. महिला महाविद्यालयात प्रवरा पोलीस व आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरु केले होते. पहिल्या तीन महिन्यांच्या कालावधीतील प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींना निरोप देण्यासाठी महाविद्यालयात निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी मार्गदर्शन करताना परजणे बोलत होते. या प्रशिक्षण कालावधीत पोलीस, आर्मी या विभागांसह मैदानी सराव, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, रायफल शुटींग, हॉर्स रायडींग अशा विविध विषयांवर तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यात आले.

परजणे म्हणाले, महिला महाविद्यालयातून शिक्षण घेवून बाहेर पडलेल्या अनेक विद्यार्थिनी आज विविध क्षेत्रांत स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. महाविद्यालयातून मिळणाऱ्या शिक्षणाचा लाभ घेवून अनेक विद्यार्थिनी आज शासकीय सेवेत कार्यरत असल्याचे सांगून मुलींच्या कलागुणांना वाव मिळावा आणि ग्रामीण भागातील मुलींनी आपल्या पालकांचे नाव उज्ज्वल करावे, यासाठी भविष्यात मुलींसाठी विविध उपक्रम राबविण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न राहील, असे सांगितले.

यावेळी वैभवी दणके या विद्यार्थिनीने प्रशिक्षण कालावधीतील अनुभवकथन करून या प्रशिक्षणाचा आम्हाला नक्कीच चांगला लाभ होईल, अशी भावना व्यक्त केली.

हे प्रशिक्षण केंद्र माजी मंत्री राधाकृष्ण विखे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे, महाविद्यालयाचे कार्यकारी अधिकारी राजेश परजणे, खासदार डॉ. सुजय विखे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुस्मिता विखे, संस्थेचे सचिव डॉ. हरिभाऊ आहेर, डॉ. राम पवार, प्रशासकीय अधिकारी सुनीता कदम,प्रभारी प्राचार्य साईप्रसाद खड्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून त्याचा मुलींना चांगला लाभ झालेला आहे.

....

फोटो-१० कोपरगाव प्रशिक्षण मुुली

100221\img-20210209-wa0028.jpg

कोपरगाव येथील महिला महाविद्यालयातील पोलीस व आर्मी प्रशिक्षण केंद्रातील मुलीना निरोप देण्यात आला.

Web Title: Opportunities for girls in rural areas through training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.