पारंपरिक सणांमधून चुका सुधारणांची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:25 AM2021-08-24T04:25:44+5:302021-08-24T04:25:44+5:30
पाथर्डी : दैनंदिन जीवन जगत असताना विपरीत परिस्थितीमुळे मानवाच्या हातून चुका होतात. कायद्याने चुका सुधारण्यासाठी व झालेल्या चुकांची शिक्षा ...
पाथर्डी : दैनंदिन जीवन जगत असताना विपरीत परिस्थितीमुळे मानवाच्या हातून चुका होतात. कायद्याने चुका सुधारण्यासाठी व झालेल्या चुकांची शिक्षा देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारली आहे. आपल्या परंपरा, सण मानवी चुकांना सुधारण्याचा व आदर्श जीवन जगण्याचा मार्ग दाखवितात, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी केले.
रक्षाबंधन सणानिमित्त रविवारी पाथर्डी पोलीस ठाण्यात बंदिवासात असलेल्या आरोपींना पोलीस भगिनींच्या वतीने राख्या बांधण्यात आल्या. यावेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते.
या उपक्रमात सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, कौशल्य वाघ, पोलीस शिपाई प्रतिभा नागरे, पोलीस शिपाई प्रियांका निजवे, पोलीस हवालदार हरिभाऊ दळवी, पोलीस शिपाई सागर मोहिते, एकनाथ गर्कल, पोलीस चालक राजेंद्र सुद्रुक, पोलीस नाईक आजिनाथ बडे, पोलीस चालक संजय बडे आदी सहभागी झाले होते.
----
२३ पाथर्डी राखी
पाथर्डी पोलीस ठाण्यात आरोपींना महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी राख्या बांधल्या.
220821\3026img-20210822-wa0031.jpg
फोटो पाथर्डी पोलीस ठाण्यात पोलीस भगिनींच्या वतीने बंदिवासात असलेल्या आरोपींना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.