विजय औटी यांची मंत्रिपदाची संधी दृष्टीक्षेपात : खोतकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 05:44 PM2017-10-17T17:44:59+5:302017-10-17T17:52:45+5:30

पारनेर येथे महिला व्यायामशाळा व हंगा येथे बाळासाहेब ठाकरे उद्यान, व्यायामशाळा व विविध कामांचे लोकार्पण राज्यमंत्री खोतकर यांच्या हस्ते झाले.

Opposition Opposition Opposition Vijay Autty: Khotkar | विजय औटी यांची मंत्रिपदाची संधी दृष्टीक्षेपात : खोतकर

विजय औटी यांची मंत्रिपदाची संधी दृष्टीक्षेपात : खोतकर

पारनेर : आमदार विजय औटी यांचे काम राज्यात आदर्श आहे. त्यांच्या कडक स्वभावाची मुख्यमंत्री दखल घेतात. त्यांच्या मंत्रिपदाची संधी जवळ आली आहे, असे सूचक उद्गार पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी काढले.
पारनेर येथे औटी व महिला बालकल्याण समितीच्या सभापती सुरेखा भालेकर यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या महिला व्यायामशाळा व हंगा येथे सेनेचे तालुकाप्रमुख निलेश लंके, जिल्हा परिषद सदस्या राणी लंके यांच्या प्रयत्नातून झालेल्या गावातील बाळासाहेब ठाकरे उद्यान, व्यायामशाळा व विविध कामांचे लोकार्पण राज्यमंत्री खोतकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार औटी होते.
खोतकर म्हणाले, पारनेर तालुक्यासारख्या दुष्काळी भागात औटी व सेनेचे तालुकाप्रमुख निलेश लंके यांनी परिसरात विकास कामांच्या माध्यमातून वेगळा ठसा उमटवला. औटी म्हणाले, पारनेर शहरासह परिसरातील महिलांसाठी व्यायामशाळा असावी अशी मागणी महिला व बालकल्याण सभापती सुरेखा भालेकर यांनी केली होती. यासाठी आपण जिल्हा क्रीडाधिकारी उदय जोशी यांच्याकडून तातडीने निधी मंजूर करून आणला. व्यायामशाळेमुळे महिलांना चांगली सुविधा झाली आहे.
माजी सभापती जयश्री औटी यांनी आ. औटी यांच्यामुळे पारनेर शहरात विकासात्मक वाटचाल झाल्याचे सांगितले. डॉ. वर्षा पुजारी, डॉ. पद्मजा पठारे, सय्यद यांची भाषणे झाली. पारनेर येथे जि.प. सदस्य काशिनाथ दाते, रामदास भोसले, सेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावंकर, नगराध्यक्षा सीमा औटी, उपनगराध्यक्ष अनिकेत औटी, सभापती सुरेखा भालेकर, किसन गंधाडे, सेनेचे शहरपमुख निलेश खोडदे, जिल्हा क्रीडाधिकारी उदय जोशी, क्रिडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे, आशा औटी, शारदा औटी उपस्थित होते़ राहुल झावरे, नामदेव ठाणगे, जयश्री झावरे, सुमन तांबे, युवराज गुंजाळ, रोहिणी मधे, आप्पासाहेब शिंदे, लिलाबाई रोहोकले या नूतन सरपंचांचा मंत्री खोतकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
हंगा येथे सेनेचे तालुकाप्रमुख निलेश लंके व जि.प.सदस्य राणी लंके यांचा ग्रामस्थांच्यावतीने मानपत्र देऊन मंत्री खोतकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला़ यावेळी चंद्रकांत मोढवे, राजेंद्र शिंदे, सरपंच हिराबाई दळवी, चंद्रकांत मोढवे, उपसरपंच संदीप शिंदे, बाबासाहेब साठे, बाबा नवले, संतोष ढवळे, सेनेचे उपतालुकप्रमुख दादा शिंदे, संदीप पवार, भाऊसाहेब नगरे उपस्थित होते.

Web Title: Opposition Opposition Opposition Vijay Autty: Khotkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.