पुणतांबा ग्रामपंचायत समोर विरोधकांचे ठिय्या आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 01:26 PM2022-08-29T13:26:50+5:302022-08-29T13:27:43+5:30
उपस्थित ग्रामस्थांना ठिय्या आंदोलन मागची भूमिका विरोधी गट विकास आघाडीचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी मांडली.
पुणतांबा: (जि.अहमदनगर):
पुणतांबा गावची जलस्वराज्य पाणीपुरवठा योजना टप्पा दोनच्या चौकशीसाठी वारंवार मागणी करूनही कानाडोळा करणाऱ्या ठेकेदार, अधिकारी, पाणीपुरवठा योजनेची समिती यांच्या विरोधात पुणतांबा ग्रामपंचायत समोर विरोधकांचे ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना ठिय्या आंदोलन मागची भूमिका विरोधी गट विकास आघाडीचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी मांडली.
राजकारण करणारे कोण व समाजकारण करणारे कोण हे गावकऱ्यांनी ओळखले पाहिजे तळ्याचे पिचींग दोन वेळेस ढासळले यावरून या योजनेचे काम किती निकृष्ट दर्जाचे आहे हे दिसून येते.योजना पूर्णपणे हस्तांतर होण्याअगोदर तळ्याचा मुरूम,दगड याची विल्हेवाट कोणी लावली याची चौकशी व्हावी.
पुणतांबा गावची पाणीपुरवठा हाच विषय नेहमी निवडणुकीत कोणताही पक्ष,गट,आघाडी यांनी आम्ही पाणीपुरवठा करणार असेच आश्वासन दिले,सतरा कोटीची योजना आणली पण योजनेतील त्रुटी,कामाचा दर्जा याबत वेळोवेळी निर्देश देऊनही अधिकारी,ठेकेदार,पाणीपुरवठा योजनेची समितीचे अध्यक्ष टाळाटाळ करत असल्याने आजचे ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आली,असून सहा महिन्यातून एकदा येतात व एकदा बोलतात या सरपंचाच्या वक्तव्याचा निषेध करतो आणि सरपंचांना प्रश्न करतो की आपण किती निधी आणला, आम्हाला अपेक्षित होते की पाणी योजनेवर बोलणे गरजेचे होते.
या सहा महिन्यात जरी येत असलो तरी आम्ही वीस ते पंचवीस लाख रुपयांचा निधी आणला.यांनी जे लोकवर्गणीतून कामे करणाऱ्यांना निधी आणता येत नसल्याने लोकवर्गणीतून कामे करतात,गावाबाहेर मीठ मोठे खड्डे करून मुरूम उचलला किती गौण खनिजाची विल्हेवाट लावली त्याची साक्ष हे खड्डे देत आहे.यांचे कार्यकर्ते कोण वाळू चोर,मुरूम चोर यांचे कार्यकर्ते आज मी यांना निर्देश देतो की आम्ही यांच्या दोन नंबरचे धंदे बंद करणार आमचे नेते खासदार सुजय विखे यांच्या पाठीमागे वाळू प्रश्नावर आम्ही सर्व उभे राहणार असून आज हे सर्व बोलण्याची संधी यांनी सहा महिन्यातून एकदा बोलतात असे बोलून दिली.
गणेश जाधव,धनंजय जाधव,गणेश बनकर,चंद्रकांत वाटेकर,सर्जेराव जाधव,सुधाकर जाधव,प्रताप वहाडणे,सुधीर नाईक,सुभाष वहाडणे,संदीप लाळे,अनिल निक्कम,प्रशांत राऊत,चांगदेव धनवटे,यांच्या सह विरोधी ग्रामपंचायत सदस्या,ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश बनकर यांनी केले.