राज्यातील जनतेची उपासमार टाळण्यासाठी शिवथाळीचा पर्याय योग्य; संग्राम जगताप यांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 12:28 PM2020-03-24T12:28:34+5:302020-03-24T13:36:01+5:30
कोरानामुळे गोरगरीब कष्टकरींसाठी जनतेची होत असलेली उपासमार टाळण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी सरकारला शिवथाळीचा पर्याय सूचविला आहे.
अहमदनगर: कोरानामुळे गोरगरीब कष्टकरींसाठी जनतेची होत असलेली उपासमार टाळण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी सरकारला शिवथाळीचा पर्याय सूचविला आहे. राज्यातील अशा गोरगरीब, कष्टकरी व ठिकठिकाणी अडकलेल्यांना शिवभोजन थाळी पॅकेटव्दारे उपलब्ध करून दिल्यास उपासमार टाळता येऊ शकते, असे जगताप यांचे म्हणणे आहे. अहमदनगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन दिलेले आहे. या निवेदनात जगताप यांनी म्हटले आहे, की कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गोरगरीब कष्टक-यांच्या हाताला काम नाही. अनेक जण कामाच्या ठिकाणी पोहाचू शकत नाहीत. याशिवाय अनेक जण ठिकठिकाणी अडकले आहेत. त्यांची सध्या उपासमार होत आहे. राज्य सरकारने राज्यात विविध ठिकाणी शिवभोजन थाळी सुरू केलेली आहे. शिवभोजन योग्य पध्दतीने हायजीन स्वरुपात पॅकेट तयार करून ते गरजूंपर्यंत पोहोच केल्यास उपासमार टाळता येईल. हे पॅकेट वाहनांव्दारे गरजंपूर्यंत पोहोच केल्यास कष्टकरी, गोरगरीब जनतेला मोठा दिलासा मिळेल. याबाबत सरकारने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जगताप यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.