पारनेरमध्ये फळबागा, हरितगृहाचे पंचनामे; शेतक-यांना मदतीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 04:53 PM2020-06-14T16:53:11+5:302020-06-14T16:53:53+5:30
पारनेर तालुक्यातील निघोज परिसरात नुकत्याच झालेल्या वादळी पावसाने फळबागांसह हरितगृहांचे नुकसान झाले आहे. येथील नुकसानीचे प्रशासनाच्या त्रिसदस्यीय समितीने पंचनामे केले. शेतक-यांना आता मदतीची प्रतीक्षा आहे.
निघोज : पारनेर तालुक्यातील निघोज परिसरात नुकत्याच झालेल्या वादळी पावसाने फळबागांसह हरितगृहांचे नुकसान झाले आहे. येथील नुकसानीचे प्रशासनाच्या त्रिसदस्यीय समितीने पंचनामे केले. शेतक-यांना आता मदतीची प्रतीक्षा आहे.
निघोज पसिरात वादळी पावसाने फळबागांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये डाळिंब, द्राक्षे, पपई, सीताफळ आदी बागांचे नुकसान झाले आहे. येथील शेतकरी बाबाजी तनपुरे यांच्या हरितगृहाचे मोठे नुकसान झाले. पॉलिथीन पेपर वादळाने उडून गेल्याने हरितगृहाचे नुकसान झाले आहे.
मंडळाधिकारी दत्तात्रय शेकटकर, तलाठी विनायक निंबाळकर, मंडळ कृषी अधिकारी व्ही. आर. थोरे, सहायक कृषी अधिकारी एच. व्ही. गाडीलकर, एस. पी. गायकवाड, एस. आर. गोरे, एस. सी. भालेराव, ए. बी. बनकर, ग्रामसेवक डी. जे. वाळके आदींनी निघोज मंडळातील ४० गावातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे केले आहेत. शेतक-यांना आता मदतीची अपेक्षा आहे.
पारनेर तालुक्यातील कोणीही शेतकरी मदतीपासून वंचित राहु नये असा प्रशासनाचा उद्देश आहे. कोणाच्या नुकसानीचे पंचनामे राहिले असतील तर त्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर यांनी केले आहे.