गुन्हा दाखल करण्याचा आदेश
By मिलिंदकुमार साळवे | Published: September 20, 2017 02:00 PM2017-09-20T14:00:49+5:302017-09-20T14:06:40+5:30
अहमदनगर : गणोरे (ता. अकोले) येथील येथील सावळेराम दातीर पाटील ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतील अपहारप्रकरणी संचालक मंडळाविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
अहमदनगर : गणोरे (ता. अकोले) येथील येथील सावळेराम दातीर पाटील ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतील अपहारप्रकरणी संचालक मंडळाविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
‘लोकमत’ने सर्वप्रथम या पतसंस्थेतील अपहार उघडकीस आणला. याबाबत १० सप्टेंबरला ‘दातीर पतसंस्थेत सव्वा पाच कोटींचा अपहार’ या मथळ्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर पतसंस्थेतील अपहाराबाबत वृत्तमालिका प्रकाशित करण्यात आली. याची गंभीर दखल घेत जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी अकोले येथील सहायक निबंधक कांतीलाल गायकवाड यांना चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले. चार्टर्ड अकाऊंटंट सुविद्या सोमाणी यांनी सन २०१६-१७ चे लेखापरीक्षण केले. त्यातून संस्थेतील अपहारावर शिक्कामोर्तब झाले. ‘लोकमत’ने पतसंस्थेतील घोटाळे उघडकीस आणल्यानंतर सहायक निबंधक गायकवाड यांनी लेखापरीक्षक सोमाणी यांच्याकडून अपहाराबाबत विशेष अहवाल मागविला होता. त्यानुसार सहायक निबंधक कार्यालयास हा विशेष अहवाल सादर झाला आहे. त्यानुसार गायकवाड यांनी सहकार खात्यातील नेहमीची दप्तर दिरंगाई न करता तात्काळ सोमाणी यांना या अपहाराबाबत संस्थेच्या संचालक मंडळाविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.
आर्थिक तपासणीत पतसंस्थेतील सावळागोंधळा उघडकीस आला. त्यानुसार पतसंस्थेने खोटे जमाखर्च करून संस्थेची दिशाभूल करून या रकमेचा अपहार केला आहे. जिल्हा बँकेव्यतिरिक्त इतर बँक खाती रक्कमेची गुंतवणूक करण्यात आलेली आहे. या गुंतवणुकीस सहकार खात्याच्या सहायक निबंधकांची परवानगी घेतली नाही. संस्थेने बँक नॉन रिफंडेबल खाती रकमेची गुंतवणूक केलेली आहे. संस्थेने इतर गुंतवणूक केली आहे. गुंतवणूक नोंदवही ठेवली नाही. संस्थेने लेखापरीक्षणासाठी कोणत्याही याद्या पुरविल्या नाहीत. डेडस्टॉक रजिस्टर ठेवले नाही, अशा अनेक बाबी समोर आल्या.