उच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश : ‘मोहटा’ प्रकरणी कारवाईचा सखोल अहवाल सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 11:27 AM2019-07-25T11:27:27+5:302019-07-25T11:37:12+5:30

पाथर्डी तालुक्यातील श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट यांनी मोहटादेवी मंदिराचा जीर्णोद्धार करताना मंदिरात १ किलो ८९० ग्रॅम सुवर्णयंत्र बनवून ते पुरताना कस्तुरी, गोरोचन यासारख्या पदार्थावर नियमबाह्य मोठा खर्च केला.

Order of High Court Police: Submit a detailed report of proceedings in case of 'Mohta' | उच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश : ‘मोहटा’ प्रकरणी कारवाईचा सखोल अहवाल सादर करा

उच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश : ‘मोहटा’ प्रकरणी कारवाईचा सखोल अहवाल सादर करा

अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट यांनी मोहटादेवी मंदिराचा जीर्णोद्धार करताना मंदिरात १ किलो ८९० ग्रॅम सुवर्णयंत्र बनवून ते पुरताना कस्तुरी, गोरोचन यासारख्या पदार्थावर नियमबाह्य मोठा खर्च केला. या मुद्यासह देवस्थानमधील आर्थिक अनियमिततेबाबत दाखल याचिकेवर बुधवारी (दि.२४) सुनावणी झाली. यावेळी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पोलिसांनी येत्या ७ आॅगस्टपर्यंत कारवाईचा सखोल अहवाल सादर करण्याचा आदेश दिला.
मोहटा देवस्थानने देवी मंदिरात १ किलो ८९० ग्रॅम सोन्याचे यंत्र पुरल्याप्रकरणी दाखल याचिकेवर यापूर्वी ११ जुलै रोजी उच्च न्यायालयाने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीवर पोलीस अधीक्षकांनी स्वत: लक्ष घालून चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता.
पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या वतीने पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी पंडित प्रदीप जाधव, वास्तुविशारद शिंदे, मुख्याधिकारी सुरेश भणगे यासह संबंधित लोकांचे जबाब आदींचा २५० पानांचा चौकशी अहवाल उच्च न्यायालयात सादर केला. पोलिसांचा चौकशी अहवाल दाखल करून घेत उच्च न्यायालयाने सदरील अहवाल बंद पाकिटात ठेवण्याचे आदेशही न्यायालयीन कर्मचाऱ्यांना दिले.
होमहवन करताना कस्तुरी व गोरोचन बाजारात सहज मिळत नाही. त्यामुळे हे पदार्थ कोठून आणले. गोरोचन विकणाºया दुकानदाराच्या साक्षी नोंदवून त्यांचीही सखोल चौकशी करून ७ आॅगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचा आदेश बुधवारी न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व के. के. सोनवणे यांनी दिला. याचिकाकर्ते नामदेव गरड यांच्या वतीने अ‍ॅड. सतीश तळेकर, अजिंक्य काळे, अविनाश खेडकर, तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे नजम देशमुख बाजू मांडत आहेत.
मोहटा देवस्थानचे जिल्हा न्यायाधीश पदसिद्ध अध्यक्ष आहेत. या मंदिराचा जीर्णोद्धार करताना सोन्याचे यंत्रे मंदिर परिसरात मंत्रोच्चारात विधीवत बसवण्याचा ठराव २०१० मध्ये करण्यात आला. यंत्रे विविध मूर्ती खाली पुरण्यात आली. ही यंत्रे तयार करणे व मंत्र उच्चारासाठी सोलापूरचे पंडित प्रदीप जाधव यांना तब्बल २४ लाख ८५ हजार रक्कम देण्यात आली आहे. याशिवाय वास्तुविशारद यांच्या प्रस्तावावरून हे सर्व काम कुठलीही निविदा न काढता करण्यात आले आहे. ‘लोकमत’ने २०१७ साली ‘मोहट्याची माया’ या मालिकेद्वारे हा प्रकार उघडकीस आणला होता. हे प्रकरण व त्यानंतरचा देवस्थानचा गैरकारभार याबाबत कारवाई होत नसल्याने गरड यांनी ही याचिका दाखल केलेली आहे.

अंधश्रद्धा नव्हे, अपहार प्रकरणासारखा तपास करा..
मोहटा येथील प्रकरणाची चौकशी करताना पोलिसांनी केवळ अंधश्रद्धा या मुद्यावर लक्ष केंद्रित करू नये. देवस्थानने जनतेच्या पैशाचा अपव्यय व अपहार केला आहे. या मुद्यानुसार या प्रकरणाचा तपास करावा, असाही आदेश यावेळी न्यायालयाने दिला.
लोकमतच्या मालिकेनंतर अंनिसच्यावतीने अविनाश पाटील, अ‍ॅड.रंजना गवांदे, बाबा आरगडे यांनी पोलिसात ट्रस्टच्याविरुद्ध तक्रार दिली होती. त्यावर पोलिसांनी कारवाई न केल्याने तेही या याचिकेत हस्तक्षेपाद्वारे सहभागी झाले आहेत.

Web Title: Order of High Court Police: Submit a detailed report of proceedings in case of 'Mohta'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.