अवयव दानातून इतरांचे आयुष्य समृद्ध व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:20 AM2021-04-04T04:20:50+5:302021-04-04T04:20:50+5:30
प्रजा चालक-मालक रिक्षा संघटना व फिनिक्स फौंडेशनच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त अवयवदानाचा संकल्प करण्यात आला. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष भैया ...
प्रजा चालक-मालक रिक्षा संघटना व फिनिक्स फौंडेशनच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त अवयवदानाचा संकल्प करण्यात आला. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष भैया पठाण, फौंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, अमोल पतंगे, लक्ष्मण बोरकर, अतुल वाघ, कैलास ढवळे, सचिन कोतकर, बब्बू सय्यद, दादा येणारे, बाबासाहेब चन्ने, बबलू शेख, नागेश बागल, आदी उपस्थित होते. रिक्षा संघटनेचे अध्यक्ष भैया पठाण म्हणाले, फिनिक्स फौंडेशनचे सामाजिक कार्यातून समाजातील वंचित घटकांसाठी काम होत आहे. या कार्यात आपलाही छोटासा हातभार लागावा, या हेतूने अवयव दानाचा संकल्प केला. याप्रसंगी संतोष बिचकुल, प्रशांत शिंदे, शेख सुलतान, शेख कलिम, शहारुख पठाण, जमीर पठाण, बाबासाहेब धिवर, राजेंद्र बोरुडे, आदी उपस्थित होते. अमोल पतंगे यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. बाबासाहेब धिवर यांनी आभार मानले.