संघटन मजबूत असल्याने प्रश्न मार्गी लागतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:31 AM2021-02-23T04:31:07+5:302021-02-23T04:31:07+5:30
संगमनेर येथे परिषदेच्या विश्वस्त मंडळाच्या झालेल्या बैठकीत रविवारी ते बोलत होते. ख्रिस्ती विकास परिषदेच्या वतीने डॉ. तांबे यांचा सत्कार ...
संगमनेर येथे परिषदेच्या विश्वस्त मंडळाच्या झालेल्या बैठकीत रविवारी ते बोलत होते. ख्रिस्ती विकास परिषदेच्या वतीने डॉ. तांबे यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. तांबे म्हणाले, ख्रिस्ती समाजाच्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी शैक्षणिक व व्यावसायिकदृष्ट्या परिषदेने युवकांसाठी कार्य हाती घेऊन समाजाने पुढे येण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य राहील.
या बैठकीमध्ये, ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले, उपाध्यक्ष अॅड. सिरील दारा, सरचिटणीस प्रफुल्ल असुर्लेकर, सुवर्णलता कदम, माध्यम सल्लागार प्रमुख सॉलोमन गायकवाड आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
भोसले यांनी ख्रिस्ती समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रांतील समस्यांवर सर्व विश्वस्त मंडळांनी चर्चा घडवून आणून उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्रातील नियोजनाचा आराखडा तयार करण्यात आला, तर कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत जनजीवन सुरळीत व्हावे. बैठकीस डॉ. शक्ती सामंत, उद्योजक अविनाश काळे, अशोक शिंदे, डॉ. विल्सन गॉडद, रोजालिना गॉडद, प्रतिभा गायकवाड आदींची उपस्थिती होती.