फेरफार नोंदीसाठी तहसील कार्यालयात शिबिराचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:16 AM2021-05-31T04:16:48+5:302021-05-31T04:16:48+5:30
राहाता तहसिल कार्यालयात शिबीराचे आयोजन नागरिकांनी लाभ घेण्याचे तहसिलदार कुंदन हिरे यांचें आवाहन शिर्डी : राहाता तालुक्यातील प्रलंबित फेरफार ...
राहाता तहसिल कार्यालयात शिबीराचे आयोजन
नागरिकांनी लाभ घेण्याचे तहसिलदार कुंदन हिरे यांचें आवाहन
शिर्डी : राहाता तालुक्यातील प्रलंबित फेरफार निर्गत करण्यासाठी मंडळनिहाय शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले आहे.
राहाता तालुक्यातील नागरिकांच्या फेरफार नोंदीबाबत तहसील कार्यालयास मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होत आहेत. खातेदारांच्या फेरफार नोंदी व इतर फेरफार कामकाज निर्गतीबाबत तहसील प्रशासनाने संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांना वेळोवेळी बैठकीमध्ये सूचना दिलेल्या आहेत. कार्यालय, राहाता येथे प्रलंबित फेरफार निर्गत करण्यासाठी मंडळनिहाय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राहाता तहसील कार्यालयात उपस्थित राहून प्रलंबित फेरफार नोंदी, फेरफार रजिस्टर, ओडिसीबाबत कामकाज करणार आहेत. उपरोक्त मंडळातील खातेदारांना नोंदीबाबत अडचणी असल्यास संबंधित तारखेला तहसील कार्यालय, राहता येथे संपर्क साधावा, असे आवाहन हिरे यांनी केले आहे.