...अन्यथा अण्णा हजारे करणार दिल्लीमध्ये आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:52 PM2020-12-30T16:52:05+5:302020-12-30T16:52:59+5:30
केंद्र सरकारने चार वर्षे केवळ आश्वासने दिली. आता शेतकऱ्यांच्या पिकांबाबतच्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींबाबत केंद्र सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा जानेवारी महिन्यात दिल्लीत आंदोलन करण्यावर ठाम आहे, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे.
सुपा : केंद्र सरकारने चार वर्षे केवळ आश्वासने दिली. आता शेतकऱ्यांच्या पिकांबाबतच्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींबाबत केंद्र सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा जानेवारी महिन्यात दिल्लीत आंदोलन करण्यावर ठाम आहे, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे.
विविध मागण्यांचे निवेदन हजारे यांनी केंद्र सरकारला पाठविले आहे. शेतकऱ्यांना शेतामाल उत्पन्नाच्या खर्चावर आधारित भाव मिळत नसल्याने तो आत्महत्य करीत आहेत. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुनार शेतकऱ्यांच्या पिकांना भाव मिळायला हवा. त्याप्रमाणे भाव मिळावा यासाठी हमीभाव जाहीर केला. तसा भाव आम्ही देतो, असे केंद्र सरकार सांगते. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना किती पैसे मिळतात ते पाहिले पाहिजे, असे अण्णांनी पत्रात म्हटले आहे.
नुकतेच विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार भागवत कराड यांच्यासह माजी मंत्री गिरीष महाजन यांनीही राळेगण येथे येऊन चर्चा केली. परंतु, आता चर्चा, आश्वासने थांबवा, ठोस निर्णय घ्या, असे हजारे यांनी पत्रात म्हटले आहे. अन्यथा जानेवारीमध्ये दिल्लीत आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.