...अन्यथा जयंत पाटील यांच्या घरासमोर उपोषण करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:19 AM2021-04-12T04:19:22+5:302021-04-12T04:19:22+5:30
श्रीगोंदा : कुकडीचे आवर्तनअंतर्गत २० एप्रिलला पाणी सोडावे. पाणी तातडीने मिळाल्यास उभी पिके व फळबागा वाचू शकतील. आवर्तन वेळेत ...
श्रीगोंदा : कुकडीचे आवर्तनअंतर्गत २० एप्रिलला पाणी सोडावे. पाणी तातडीने मिळाल्यास उभी पिके व फळबागा वाचू शकतील. आवर्तन वेळेत न सोडल्यास नाही २१ एप्रिलपासून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या घरासमोर उपोषण करू, असा इशारा कुकडी पाटपाणी समितीचे अध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी रविवारी दिला आहे.
सल्लागार समितीच्या ९ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीमध्ये कुकडीचे आवर्तन घोड, विसापूरप्रमाणे सोडण्याचा निर्णय होईल, असे अपेक्षित होते. परंतु, पुणे जिल्ह्यातील प्रतिनिधीने पिंपळगाव जोग्याच्या आवर्तनाचा विषय पुढे करून पाण्याचा हा निर्णय होऊ दिला नाही. यामध्ये अधिकाऱ्यांनीही त्यांनाच साथ दिली. पिंपळगाव जोग्याचे आवर्तन संपल्यानंतर म्हणजेच मे महिन्यामध्ये अंदाजे १० मे रोजी कुकडीचे आवर्तन सुटणार आहे, असे नेत्यांनी जाहीर केले आहे. मात्र अधिकाऱ्यांनी कुकडीचे आवर्तन कधी सुटणार यावर भाष्य केलेले नाही. त्यामुळे कुकडीचे आवर्तन मे महिन्यातही मिळते की नाही, याची शाश्वती नाही. हा कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर अन्याय आहे, असे म्हस्के यांनी निवेदनात म्हटले आहे.